ऑक्टोबरच्या शेवटी पर्यंत भंगारातून 1,000 कोटी रुपये कमावण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. केंद्र सरकार 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दिवसांमध्ये आपले विशेष अभियान 3.0 सुरू करणार आहे. स्वच्छतेवर भर देणे हा या मोहिमेचा उद्देश असणार आहे.
कमाईचा नवीन रेकॉर्ड :-
एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आहे की, गेल्या वर्षीही अशीच एक मोहीम राबविण्यात आली होती त्यामध्ये 371 कोटी रुपये कमावले होते. यावर्षीही ही मोहिम राबवली जाणार आहे. ज्यामध्ये एकूण 400 कोटी रुपयांचा महसूल मिळणे अशी आशा सरकारला आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातच गव्हर्मेंट ला 62 कोटी रुपयांची कमाई झाली होती. यापूर्वीची मोहिम नोव्हेंबरमध्ये थांबवण्यात आली होती. सरकारला स्वच्छता मोहिमेतून प्रत्येक महिनाला 20 कोटी रुपये कमाई करण्याचे लक्ष आहे.
या मोहिमेच्या मदतीने सरकारी कार्यालयातील कॉरिडॉर स्वच्छ केले जातील, फायलींनी भरलेले लोखंडी कॅबिनेट रिकामे केले जातील आणि जुन्या गाड्या बाहेर काढलया जातील.
आकडेवारीनुसार, पहिल्या मोहिमेपासून आजपर्यंत सुमारे 31 लाख सरकारी फायली भंगारात विकल्या गेल्यालया आहेत. या मोहिमेच्या मदतीने सरकारी कार्यालयांची अंदाजे 185 लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली आहे असे पण सांगितले जात आहे .
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिण्यात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेमध्ये 90 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली होती. यावर्षी 100 लाख चौरस फूट जागा रिकामी करण्याची योजना सरकाराने आखली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.