Sony Liv वर नक्की एकदा बघण्यासारखा आहे. "डेरींग तो करना पडेगा ना डार्लिंग....!" हा यातला मला आवडलेला सर्वात भारी डायलॉग.आणि खरय डेरींग शिवाय सक्सेस तरी कुठं मिळतं,पण जी डेरिंग चुकीच्या कामासाठी केल्या जाते तिचा अंत निश्चित असतोच आणि ही सिरीज बघताना आपण नकळत त्या तेलगी च्या प्रेमात पडतो....!

Scam 2003 The Telgi Story Review - 30 हजार कोटींचा स्टॅम्प पेपर  घोटाळा करणाऱ्या अब्दुल करीम तेलगी जाणून घ्या.
Scam 2003 The Telgi Story Review - 30 हजार कोटींचा स्टॅम्प पेपर  घोटाळा करणाऱ्या अब्दुल करीम तेलगी जाणून घ्या.

अगदी साधरण दिसणारा तेलगी तितकाच फॅमिली man पण दाखवला आहे आई ,बायको आणि मुलगी यांची खुप काळजी करणारा त्यांच्यावर जीव लावणारा तेलगी प्रत्येक बाईला आवडेल असाच दाखवला आहे. 

हंसल मेहता आणि टीमला स्कॅम १९९३ पासून सापडलेला खजिना विलक्षण असा आहे. देशात अनेक वर्षापासून घोटाळे चालू आहेत आणि पुढचे अनेक वर्ष ते चालूच राहतील यात काही शंका नाही. त्यामुळे १९९३ चा हर्षद मेहता असो किंवा २००३ चा तेलगी, लोकं तर आता या टीमला अजून २-४ घोटाळे सुचवतील इतकं भन्नाट या सिरिजची घोडदौड आहे. पुस्तकावर प्रेरित असलेले अनेक सिनेमे आहेत, पण सिनेमॅटिकली एखाद्या गोष्टीचं ड्रामाटायझेशन चपखल जमणं हे दिग्दर्शकीय कसब आहे. शो रनर म्हणून हंसल मेहता असले तरी तुषार हिरानंदानीचं दिग्दर्शन कौतुकास्पद आहे. ५  भागाची ही मालिका स्टॅम्प पेपर घोटाळ्याचे अनेक पैलू उलगडून सांगते. 

अशा वेब सीरिज नंतर समाजात त्याविषयी चर्चा सुरू होते, मग ती राजकारण, प्रसारमाध्यमांपासून अगदी चहाच्या टपरीपर्यंत सगळीकडे ती होणारच. म्हणूनच की काय, जेव्हा तेलगीने नार्को टेस्टमध्ये काही बड्या नेत्यांची नाव घेतल्यावर त्याचं राजकारण आज २० वर्षांनी पुन्हा सुरू झालं आहे. कोणी कोणाचा राजीनामा घेतला किंवा कोणत्या अधिकाऱ्याने हा घोटाळा उघडकीस आणला याच्या मिठमसाला लावून मुलाखती आणि बातम्या पुढचे काही महिने चालूच राहतील. राजकारणी, पोलीस यंत्रणा, सरकारी अधिकारी यांनी एकमेकांच्या साहाय्याने अशी एक यंत्रणा तयार केली ज्याच्यावर सामान्य माणूस पोहोचू शकत नाही. या वेब सीरिजमध्ये एक संवाद आहे, 'ये नेतालोग होते हैं ना, ये आधे नंगे होते हैं, इन्होने बस एक जांग्या पेहेना होता है और उसकी नाडी पब्लिकके हात मे होती हैं, जब पब्लिक ये हात छोडती हैं ना, तब ये पुरे नंगे हो जाते हैं'.

हर्षद मेहता,तेलगी पासून निरव,मल्ल्या यांनी नेत्यांच्या आणि पर्यायाने यंत्रणेच्या वर जाऊन पैसे कमावले, त्यामध्ये सगळ्यांना गुडघ्यांवर बसवलं. हे सगळं शक्य झालं ते शोधलेल्या त्या नाडीमुळे आणि नागडं होण्याची भीती दाखवून. ही माणसं इंटरेस्टिंग होती, म्हणायला गेलं तर हे सगळेच गुन्हेगार पण संपूर्ण यंत्रणेला हलवून सोडलं. यंत्रणा ही सामान्य माणसासाठी आहे ज्याला ती पाळायची आहे पण ती तोडून पुढे जायची मुभा ही प्रत्येकाला आहेच ज्याच्या अंगात ते करायची धमक आहे. 

'गगन देव रायर', हा सापडलेला हिरा फारच अप्रतिम अभिनेता आहे. थेटर ॲक्टरची ताकद आणि सादरीकरणाची सहजता गगनने पेश केली. समीर धर्माधिकारी, भारत जाधव, शशांक केतकर, नंदू माधव, निखिल रत्नपारखी, भरत दाभोलकर, अश्या दमदार कलाकारांची फौज विविध भूमिकेतून समोर येते तेव्हा आनंद होतो. या मालिकेचे अद्याप ५ भाग प्रदर्शित झालेय, पुढील ५ भाग लवकरच येतील अशी अपेक्षा आहे. स्टॅम्प पेपर सारखा एक महत्त्वाचा घोटाळा आणि त्यावर बनवलेली ही कलाकृती चांगली जमुन आली आहे. 

तर ३०० करोड च्या स्कॅम साठी नक्की बघा....मला आवडला कदाचित तुम्हालाही नक्कीच आवडेल...!

ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती थेट व्हॉट्सअ‍ॅपवर 
ItsMarathi ला जॉईन व्हा. :- https://chat.whatsapp.com/Hc9Cr4QhIBF77Ion9IzgT7

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने