‘आम्ही बाबरी पाडू शकतो; तर पुण्येश्वराजवळील बेकायदा मस्जिद पाडूच शकतो’’!‘आम्ही बाबरी पाडू शकतो; तर पुण्येश्वराजवळील बेकायदा मस्जिद पाडूच शकतो"!
पुण्यात श्री. पुण्येश्वर मंदिराजवळील अनधिकृत मस्जिदीचे बांधकाम ४८ तासांत हटवा... अन्यथा आम्ही हटवू... असा इशारा पुणे महापालिका प्रशासनाला दिला आहे. पुणे शहराला ज्या मंदिराच्या नावावरुन ओळखले जाते. तो इतिहास कायम ठेवण्यासाठी आम्ही आता लढा सुरू केला आहे. पुण्येश्वराला अतिक्रमणातून मुक्त केले पाहिजे... न्यायालयाने या बांधकामाला स्थगिती दिली आहे. पण, प्रशासन कारवाई करीत नाही. प्रशासनाने जी मुळमुळीत भूमिका घेतली आहे. त्या प्रशासनला जागे करण्यासाठी आज हर हर महादेवचा जयघोष आम्ही करतोय.
यावेळी भाजपाचे आमदार महेश लांडगे, नितेश राणे, पुणे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रखर हिंदूत्ववादी नेते डॉ. गजानन एकबोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हिंदूत्वाशी तोडजोड कदापि नाही...!
"आम्ही जर अयोध्येत जावून बाबरी पाडू शकतो... तर पुण्येश्वर मंदिराजवळीत बांधकाम कधिही पाडू शकतो...." अशा इशारा भाजपा चे आमदार श्री. महेशदादा लांडगे यांनी प्रशासनाला दिला आहे.
कोण आला रे कोण आला…
राज्याच्या विधानसभा सभागृहामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्याबरोबर आमदार महेश लांडगे यांची शब्दीक खडाजंगी झाली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी लांडगे यांचा प्रखर हिंदूत्ववादी नेतो म्हणून whatsapp स्टेटस ठेवून समर्थन केले होते. काल झालेल्या आंदोलनात आमदार लांडगे यांनी भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामध्ये ‘‘कोण आला रे कोण आला… अबू आझमीचा बाप आला…’’ अशा प्रक्षोभक घोषणा देण्यात आल्या होत्या . आमदार लांडगे यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. पुण्याच्या कोंढवा, हडपसर भागात जर काही लोक घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतील. तर आम्ही सुद्धा घरात घुसून मारल्याशिवाय गप्प बसणार नाही… अशा इशाराही आमदार लांडगे यांनी दिला. त्यामुळे पुण्यात हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.