MIDC Bharti 2023 - 24 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी बंपर भरती, संपूर्ण माहिती पहा Itsmarathi.com
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थातच MIDC च्या आस्थापनेवरील विविध पदांच्या बंपर भरतीची जाहिरात आज नुकतीच प्रसिद्ध केली गेली आहे. MIDC Bharti 2023 - 24 अंतर्गत विविध पदांच्या भरती बाबत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
गट 'अ', गट 'ब' व गट 'क' च्या एकूण 802 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष म्हणजे ही सर्व पदे सरळसेवा अंतर्गत येणार आहेत. आणि त्यासाठीच MIDC Recruitment 2023-24 मधील ही सर्व पदे सरळसेवेने भरती करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीतील संपूर्ण माहिती वाचूनच ऑनलाइन आवेदन करावे असे जाहिराती मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याबाबतची सर्व माहिती आणि आवेदनपत्राची लिंक itsmarathi.com वर खालीलप्रमाणे आहे.
![]() |
MIDC Bharti 2023 - 24 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी बंपर भरती |
MIDC Bharti 2023 - 24 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी बंपर भरती, संपूर्ण माहिती पहा Itsmarathi.com
MIDC Recruitment 2023-24 मध्ये एकूण 34 अशा वेगवेगळ्या संवर्गाच्या जागा भरल्या जाणार आहेत.
त्यात कार्यकारी अभियंता, उपअभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत यांत्रिकी), तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, सहयोगी रचनाकार, उप-रचनाकार, उपमुख्य लेखा अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), लघु टंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, पंपचालक, जोडारी, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतंत्री, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक इत्यादी अशा विविध प्रकारच्या पदांच्या एकूण 802 जागा या भरती प्रक्रियेमध्ये भरल्या जाणार आहेत.
MIDC Bharti 2023 - 24
ऑनलाइन अर्जाचा कालावधी खालीलप्रमाणे असेल
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात : 02 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 25 सप्टेंबर 2023
शुल्क भरणे : दि 25 सप्टेंबर 2023 पर्यंत
प्रवेशपत्र उपलब्ध : परिक्षेच्या 7 दिवस आधी
MIDC Bharti 2023 जाहिरात आणि लिंक
MIDC BHARATI 2023 ADVERTISEMENT LINKs
जाहिरात पाहा :- https://recruitment.midcindia.org/Filess/Recruitment-Advertisement-2023.pdf
Online Form Link :- https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
MIDC MAIN WEBSITE :- https://www.midcindia.org/
Educational Qualification For MIDC Bharti 2023 - 24
ज्या त्या पदानुसार शैक्षणिक अर्हता, पात्रता तसेच वेतनमान अशी सर्व माहिती पाहण्यासाठी वरील जाहीरात डाउनलोड करून पाहावी.
तसेच परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्र आल्यानंतर त्यात नमूद केले जाईल. संभाव्य बदलांबद्दल वेळोवेळी MIDC च्या संकेतस्थळावर अधिक माहिती प्रसारित केली जाईल त्यामुळे वेळोवेळी वरील links ला भेट देत राहा.
MIDC Bharti 2023-24 More Details
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.midcindia.org संकेतस्थळास भेट देण्यात यावी. सोबतच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, विहित वयोमर्यादा, वयोमर्यादाची शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण, तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन सूचना इत्यादी बाबतचा तपशील वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.