Jalna Baton Attack Incident: मराठा क्रांती मोर्चा सुरू असताना झालेल्या जालना लाठीचार्ज प्रकरणावर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता मा. मुख्यमंत्री महोदयांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाचा नेमकं काय म्हणाले श्री. एकनाथ शिंदे साहेब ?

मराठा क्रांती मोर्चा  (Maratha Kranti Morchya ) : Jalna Baton Attack Incident उद्रेकानंतर मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' शब्द.
मराठा क्रांती मोर्चा : उद्रेकानंतर मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' शब्द

मुंबई: मराठा क्रांती मोर्चा अंतर्गत मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील 

अंतरवाली ह्या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागून दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी होईल असे  सांगत मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची  प्रामाणिक भूमिका आहे.  तसेच सर्वच नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

आपले म्हणणे मांडताना आणि सोबतच यासंदर्भातील माहिती देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या घटनेची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडून त्यांनी स्वतः माहिती घेतली आहे.

    तत्पूर्वी मी या आंदोलनाच्या नेत्यांशी देखील संपर्क करून संवाद साधला होता. त्यांच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगतानाच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली होती. मात्र आंदोलनावर ते ठाम राहिल्याने त्यांची प्रकृती खालावत होती. 

     आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक त्यांना भेटायला गेले होते. त्यांची प्रकृती पाहून त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी विनंती देखील त्यांनी केली होती.

       मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका राज्य शासनाची आहे. या समाजाला न्याय देण्याची भावना आणि भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल.

     त्यामुळे नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

गृहमंत्री फडणवीसांनी देखील यावेळी आपले म्हणणे मांडले आहे ते म्हणाले, घटना दुर्देवी, आम्ही त्यांची समजूत काढत होतो...

  दरम्यान जालना शहरातील चंदनझीरा, नागेवाडी, दावलवाडी तसेच अंबड रोडवरील आंतरवाली येथे मराठा समाजाच्या वतीने महामार्गावर दोन्ही बाजूने टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

    यामुळे औरंगाबाद-जालना महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून  असून जालना-अंबड महामार्गावर अंतरवाली येथे एक ट्रक आणि कार देखील जाळण्यात आली आहे. 

    दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. यावेळी आंदोलकांच्या वतीने राज्य शासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्या. या घटनेच्या निषेधार्ह मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना जिल्हा बंदची हाक देण्यात येत आहे.

     आरोग्य सुविधा, शाळा आणि महाविद्यालय सोडता सर्व व्यापारी प्रतिष्ठान, वाहतूक, बाजारपेठा बंद ठेवून समस्त जालना करांनी सहकार्य करावे, अशी विनंती जालना जिल्हा मराठा मोर्चा वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने