मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा आरक्षण मिळावे याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी "मराठा आरक्षण मिळालंच पायजे" अशी जोरदार आरोळी देत गावातीलच तलावात एका तरुणाने उडी टाकत जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे घडली.
![]() |
'मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे' Maratha आरक्षणासाठी तरुणाने संपवलं जीवन ! मोठी बातमी |
बुधवारी सायंकाळी सुमारे साडेचार दरम्यान ही घटना घडल्याचे वृत्त आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेत घटनेनंतर गावात महसुल तसेच पोलीस प्रशासन तात्काळ दाखल झाले असून ग्रामस्थांनी एकत्र जमून मोठी घोषणाबाजी केली.
धाराशिवमध्ये माडज येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने तलावात उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्याने तलावात उडी घेतल्याचं बोललं जात आहे. माडज येथील रहिवासी असलेल्या किसन चंद्रकांत माने (वय वर्षे 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रत्यक्षदर्शी श्री. व्यंकट गाडे तसेच मयत तरुणाचे चुलते श्री. शिवाजी माने तसेच स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार किसन माने हा तरुण गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी चर्चा करत होता.
दरम्यान बुधवारी दुपारी अशीच काही चर्चा श्री. गाडे यांच्या दुकानासमोर बसून सुरू असताना किसन यांनी अंगावरील कपडे काढत "मी गेलो तरी तुम्हाला मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे" अशी आरोळी देत गाव तलावाकडे धाव घेतली. बघता बघता क्षणार्धातच त्याने तलावात उडी घेतली त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तलावातील गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या धक्कादायक दुर्दैवी घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. घटनेनंतर महसुल तसेच पोलीस प्रशासन गावात दाखल झाले आहे.
गावात दाखल झालेल्या महसूल प्रशासनाचे अधिकारी श्री. राजाराम केलूरकर यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेत असल्याचे वृत्त वाहिन्यांना सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.