तुम्ही एक उद्योजक असाल व्यावसायिक असाल किंवा जबरदस्त रील्स बनवणारे आणि वेगवेगळ्या प्रकारचे content निर्माण करणारे रील्स स्टार असाल किंवा digital Content Creator असाल किंवा मग आपली वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्य वेगवेगळे ठेवणारे असाल . तुम्हाला वेगवेगळे Instagram Accounts वापरावे लागत असतीलच पण हे वापर करत असताना तुम्हाला प्रत्येकवेळी वेगवेगळे फोन्स वापरण्याची गरज नाही. 

Instagram वर एका पेक्षा जास्त अकाउंट कशी वापरायची? How to Add and Switch Multiple Accounts on Instagram
Instagram वर एका पेक्षा जास्त अकाउंट कशी वापरायची? How to Add and Switch Multiple Accounts on Instagram


  हा लेख तुम्हाला एकापेक्षा जास्ती Instagram अकाऊंटस एकाच फोन, आय फोन , टॅब्लेट मध्ये कशी add करायची आणि वापरायची याबद्दल माहिती देईल.

जेणेकरून प्रत्येक वेळी तुम्हाला वेगळा फोन अथवा app clone वापरण्याची गरज भासणार नाही.

आपली वेगवेगळी Insta Accounts एकाच फोन मध्ये वापरणं पाहिजे तितकंच सोप्प आहे. 
Instagram ची पद्धत आयफोन आणि Android दोन्ही मध्ये जवळपास एक सारखीच असल्यामुळे खालील पद्धत दोन्ही प्रकारच्या फोन्स ला लागू पडेल. 

1. सर्वात प्रथम आपल्या फोन मधील Instagramon app ओपन करा आणि खालील उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल आयकॉन वर क्लिक करा  (profile icon).

2. प्रोफाइल फोटो शेजारी असलेल्या Down Arrow वर क्लिक करा आणि (Add Account) अर्थात खाते जोडा हा पर्याय निवडा.

3. त्यानंतर Log into existing account हा पर्याय निवडा आणि  आपल्या नवीन / दुसऱ्या खात्याची login माहिती अर्थात युझरनेम आणि पासवर्ड  टाकून sign in करा.

झालं इतकं सोप्प आहे हे सर्व.. तुम्हाला जर अजून अधिक इतर कोणतेही instagram Account जोडायचे असेल तर वरील स्टेप्स परत follow करा.

वेगवेगळ्या Insta अकाउंट मध्ये लॉग इन कसे कराल ? Switch Between Multiple Instagram Accounts

एकदा तुम्ही Instagram अँपमध्ये तुमची खाती जोडली की, त्यामध्ये स्विच करणे Android आणि iPhone वर एकदम सोप्प आहे. आपण त्याबद्दल जाणून घेऊया एका insta Id वरून दुसऱ्या Insta Id वर जाण्याचे  असे दोन भिन्न मार्ग आहेत. येथे दोन्ही आहेत.

प्रोफाइल बटनावरून खाती बदलणे Switch Between Instagram Accounts From the Profile Tab

1. Instagram ओपन करा आणि प्रोफाइल बटनावर क्लिक करा. 

2. त्या शेजारी असलेल्या down arrow अर्थात खाली दाखवलेल्या बाणावर क्लिक करा. 

3. हव्या त्या खात्यावर लॉगिन करा.

ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती थेट व्हॉट्सअ‍ॅपवर 
ItsMarathi ला जॉईन व्हा. :- https://chat.whatsapp.com/Hc9Cr4QhIBF77Ion9IzgT7

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने