मराठा आरक्षणासंदर्भातील मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब - उपमुख्यमंत्री अजितदादा  पवार यांच्या कथित वक्तव्याच्या व्हिडीओ मुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडियोमुळे वाद; जालन्याला  भेटायचे टाळले, दुही निर्माण करण्याचा झाला प्रयत्न – एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या व्हिडियोमुळे वाद; जालन्याला  भेटायचे टाळले, दुही निर्माण करण्याचा झाला प्रयत्न – एकनाथ शिंदे

मुंबई: 

      मराठा आरक्षणासंदर्भातील मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कथित वक्तव्याच्या व्हिडीओ मुळे संतप्त प्रतिक्रिया उमटताच आमच्या संभाषणात फेरफार करून सरकार आणि समाजात दुही निर्माण करण्याचा खोडसाळपणा करण्यात आल्याचा खुलासा मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी बुधवारी केला. मराठा आरक्षणाबाबत सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून समाजबांधवांनी अपप्रचाराला बळी पडू नये,असे आवाहनही त्यांनी केले आहे. जरांगे यांनी अट घातली असली तरी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जालन्याला भेटायचे टाळले आहे .

मनोज जरांगे-पाटील यांनी यांनी जालना जिल्ह्यातमध्ये  सुरू केलेल्या उपोषण, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद चालू  असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या कथित संभाषणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवरून प्रसारित  झाली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही हा विडिओ  ट्वीट करीत सरकारवर टीका केली आहे 

शिंदे साहेबानी मात्र  हा खोडसाळपणा असल्याचे सांगत आरोप फेटाळले आणि मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले. मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या मुद्दय़ांवर सकारात्मक आपण  बोलू या, अशी चर्चा आम्ही करीत असताना आमचा संवाद ‘समाजमाध्यमांवरून’ चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरविणे खोडसाळपणाचे आहे, असे मुख्यमंत्री श्री, एकनाथ शिंदे यांनी  स्पष्ट केले..

दौरा लांबणीवर

मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जालना येथे यावे, अशी अट घातली आहे. यानुसार शिंदे सायंकाळी जालन्याला जाणार असल्याची चर्चा होती. उपोषण सोडण्यासाठी जालन्यात जाण्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार फारसे उत्सुक नव्हते असं बोललं जात आहे . मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना एवढे महत्त्व द्यावे का,? अशी चर्चा सरकारच्या पातळीवर होती. ‘जरांगे यांच्याशी मंत्र्यांचे शिष्टमंडळ चर्चा करीत असून आपणही काल त्यांच्याशी चर्चा केली आहे. चर्चा झाल्यावर त्यांना भेटण्याबाबतचा निर्णय घेऊ, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

त्या कथित व्हिडीओ मध्ये  संवाद ?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : आपल्याला काय बोलायचे आणि निघून जायचे.


उपमुख्यमंत्री अजित पवार : हो.. यस


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : माइक चालू आहे.

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने