" The Silent Sea " (season 1)❤️🌿✨
(science fiction, mysterious, thriller korean drama)
भविष्यात आपल्या पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण खूपच कमी झालेलं असतं आणि हे प्रमाण या लेव्हल पर्यंत पोहचलेलं असतं की लोकांना रांगेत उभं राहून पाणी घ्यावं लागतं आणि ते ही अश्याप्रकरे जसं आत्ता आपण मशिन मधून पेट्रोल/डिझेल घेतोय ते ही विकत घेऊन.
आपली पृथ्वी वातावरणाच्या बदलावामुळे हळूहळू नष्ट होत जातं असते. अश्या परिस्थितीत वैज्ञानिकांच्या एका तुकडीला चंद्रावर एका अश्या मिशन साठी पाठवले जाते जिथे त्यांना चंद्रावर असणाऱ्या एका स्पेस स्टेशन मधून एक खास प्रकारचं सँपल पृथ्वीवर घेऊन येयचं असतं. आणि हे सर्व त्यांना केवळ २४ तासात करणं आवश्यक असतं.
जेव्हा वैज्ञानिकांची तुकडी चंद्रावर पोहोचणारच असते पण त्याचवेळेस त्यांच्या स्पेसशिप मध्ये काहीतरी बिघाड होतो आणि त्यांना emergency landing करावी लागते. या दरम्यान त्यांचं स्पेसशिप संपूर्णतः क्रॅश होऊन जातं. त्यामुळे चंद्रावर असणाऱ्या स्पेस स्टेशन पर्यंत ते चालतच जायला निघतात.
त्यांच्या सूट मध्ये ऑक्सिजन केवळ मुबलक प्रमाणातच राहिलेलं असतं. यात बर्यांच वैज्ञानिकांना दुखापत ही होते. इथूनच त्यांचं खरं adventure सुरू होतं. परंतु तिथे पोहचल्यानंतर या वैज्ञानिकांच्या आयुष्यात जीवन मृत्यूचा खेळ तेव्हा सुरु होतो जेव्हा ते चंद्रावर असणाऱ्या त्या स्पेस स्टेशन मध्ये पोहचतात आणि त्यांना त्या स्पेस स्टेशनमधील काही खास गुपिते माहिती होत जातात.
पुढे या कथेत काय काय होत जातं, असं कोणतं गुपीत त्यांना समजतं, त्यांना ते खास प्रकारचं सँपल मिळतं का, कोण जिवंत राहतं कोण नाही, ते परत पृथ्वीवर परततात का ? इत्यादी प्रश्नांच्या उत्तरासाठी तुम्हाला ही वेब सिरीज पाहावी लागणार.
ही वेब सिरीज आपल्याला असा महत्त्वाचा संदेश देते की, पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणे, पाण्याची मूलत: बचत करणे आणि केवळ आपल्या सध्याच्या पिढीच्या फायद्यासाठीच नव्हे तर भविष्यातील हवामान संकट रोखण्यासाठी शक्य तितकी कृती करणे, जर आपण आत्ताच पाणी नाही वाचवलं तर पुढे जाऊन परिस्थिती अत्यंत बिकट होईल.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.