Talathi Bharti 2023 Hall Ticket : महसूल व वन विभाग तलाठी पदभरती परीक्षा १७ ऑगस्टपासून; परीक्षेचे हॉलतिकीत आजपासून.
Maharashtra Talathi Bharti Exams 2023 Hall ticket : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा करण्यात आलेली असून , या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेच्या तारखांची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती . TCS च्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार असून, १९ दिवसांच्या कालावधीत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा पूर्ण होणार आहे. परिपत्रकात जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या तीन दिवस अगोदर म्हणजेच, उमेदवारांना आजपासून परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाइन मिळणार आहेत.
![]() |
Talathi Bharti 2023 Hall Ticket : तलाठी पदभरती परीक्षा १७ ऑगस्टपासून; परीक्षेचे हॉलतिकीत आजपासून |
Maharashtra Talathi Bharti 2023 हॉल तिकीट :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test) घेण्यात येणार आहे.तलाठी पदाच्या या ४३४४ जागांच्या भरतीसाठी संपूर्ण राज्यातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज भरले गेले आहेत. या अगोदर तलाठीसाठी परीक्षा फक्त एका दिवशी होणार होती परंतु आता ही परीक्षा तब्बल १९ दिवस चालणार आहे.काही दिवसांपूर्वी या परीक्षेचे वेळापत्रकही अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले होते.
तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक असणारी ही परीक्षा १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असून, ही परीक्षा ३ सत्रांमध्ये घेतली जाणार आहे.
परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे :
सदर भरतीमधील जागांसाठी Apply केलेल्या उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्राचे नाव परीक्षेपूर्वी किमान ५ ते ६ सहा दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) उमेदवारांना परीक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर मिळणार आहे.या बाबतीतील माहिती उमेदवारांना मोबाईल, ई-मेल, आणि अर्जासाठी वापरण्यात आलेल्या प्रोफाईलवर उपलब्ध होणार आहे.
आज मिळणार हॉलतिकीट :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४३४४ पदांच्या भरतीच्या परीक्षेच्या काही दिवसांवर आलेल्या आहेत . TCS च्या वतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, TCS आणि शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांनुसार परीक्षेचे प्रवेश पत्र (Talathi Bharti Hall-ticket) उमेदवारांना परीक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार, तलाठी भरतीसाठी अर्ज करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आजपासून हॉलतिकीट अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Hall Ticket संदर्भातील माहिती उमेदवाराच्या मोबाईल, ईमेल आयडी वर पाठवली वाजणार आहे. सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल युजर आयडी एकदा चेक करून पाहावे की मेल आयडी जो दिलेला आहे तो, मोबाईल नंबर जो दिलेला आहे तो आपण बरोबर दिलेला आहे की नाही याची पडताळणी अगोदरच करून घ्यावी..
परीक्षेचे स्वरूप : (Talathi Bharti 2023 Hall Ticket )
१. तलाठी पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन असणार आहे.
२. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/ अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी ५० गुण,
३. अशी एकूण २०० गुणांची परीक्षा उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने द्यावी लागणार आहे.
४. प्रत्येक विषयाच्या विभागात २५ प्रश्न असून, प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ गुण असणार आहेत .
५. सदर परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान असेल. परंतु, मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) समान राहील.
६. निवडप्रक्रियेत पात्र होण्यासाठी उमेदवाराला किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे गरजेचे (अनिवार्य ) असणार आहे.
तलाठी पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी, आणि तुमचे हॉलतिकीट मिळवण्यासाठी (Download करण्यासाठी) http://mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
MPSC || EXAM PREPARATION / SYLLABUS GUIDE || स्पर्धा परीक्षांविषयी सर्व काही||
मी तलाठी होणारच ....! __संपूर्ण मार्गदर्शन !!!
https://youtu.be/7jsAiQAlk7w
https://youtu.be/ucorMk9UQnc
https://youtu.be/7jsAiQAlk7w
https://youtu.be/ucorMk9UQnc
This video is all about the Talathi exam.
It really helps in all studying for the Talathi exam.
Note :-
स्पर्धा परीक्षांविषयी सर्व माहिती- अभ्यासक्रम आणि कोणत्याही इतर माहिती
Youtube वर पाहण्यासाठी या https://www.youtube.com/@JUNIORSTARS चॅनेल ला Subscribe करायला ही विसरू नका...!
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.