Chiplun : Nilima Chavhan  नीलिमा चव्हाण च्या मृत्यूच्या धक्कादायक बातमीने संपूर्ण चिपळूण हादरले आहे. 

चिपळूण तालूक्यातील ओमली या गावातील रहिवासी असलेल्या नीलिमा चव्हाण चा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अतिशय निर्दयपणे आणि एकदम तीव्र बदलाच्या भावनेने केला जावा इतका क्रूरपणे झालेली हत्या पाहून पोलिसांना सुद्धा घाम फुटला. 
Nilima Chavhan Chiplun News Marathi नीलिमा चव्हाणचा मृत्यू धक्कादायकच  चिपळूण हादरले
Nilima Chavhan Chiplun News Marathi नीलिमा चव्हाणचा मृत्यू धक्कादायकच  चिपळूण हादरले

      नीलिमा चव्हाण (nilima Chavhan ) ही स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या दापोली या  शाखेत कार्यरत होती. 29 जुलै 2023 अर्थात गेल्या महिन्याच्या शनिवारी दापोली बँकेतून घरी ओमळी chiplun येथे येण्यासाठी ती बसने निघाली होती. या प्रवासादरम्यानच ती वाटेतूनच बेपत्ता झाली होती. दरम्यानच्या साधारण दोन तीन दिवस तर तिचा पत्ताच लागला नव्हता आणि शेवटी 1 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास दाभोळ खाडी येते तिचा मृतदेह आढळून आला.  

विशेष म्हणजे या मृतदेहाची अवस्था फार वाईट होती. मृतदेहाच्या डोक्यावरील सर्व केस नष्ट केले गेले होते आणि ओळख पटू नये यासाठी तिच्या भुवया देखील काढण्यात आल्या होत्या. अत्यंत वाईट अशा अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आल्याने सगळीकडे शोकांतिका पसरली. पोलिस देखील हा प्रकार पाहून चक्रावून गेले होते. 

     मृतदेहाची अवस्था पाहता नीलिमावर सामूहिक बलात्कार झाल्याचाही प्राथमिक संशय पोलिसांना आहे. 

 दरम्यान नीलिमा चव्हाण ची हत्या ती ही इतक्या निर्घृणपणे का करण्यात आली हे अद्याप तरी समजू शकले नसले तरीही  आत्तापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात  दापोलीतील खेड येथील बस स्थानकाच्या सीसीटीव्हीत नीलिमा चव्हाण दिसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचसोबत ती खेडमध्ये एका मुलीबरोबर Chiplunla जाणाऱ्या गाडीत बसताना देखील सीसीटीव्हीत कैद झालं आहे. याच प्रवासानंतर ती बेपत्ता झाली होती मात्र ती नक्की कोणत्या बसस्थानकावर उतरली याची माहिती अद्याप तरी समजली नाही. तिचा मोबाईल नंबर ही बंदच दाखवत होता. तपास यंत्रणेला 29 जुलै च्या रात्री 12:05 वाजता मोबाईल चे शेवटचे लोकेशन अंजनी येथे दाखवत होते. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत असून लवकरात लवकर प्रकरणाचा उलगडा होऊन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील अशी आशा आहे.

मात्र या सर्व प्रकरणावरून Chiplun तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज आता प्रचंड आक्रमक झाला आहे. नाभिक समाजाने या प्रकरणाचा लवकरात लवकर वरिष्ठ यंत्रणांमार्फत कसून तपास करावा आणि चव्हाण कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

 एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणीचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला होता. या मृतदेहावरून तरूणीची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. कारण तरूणीच्या मृतदेहाच्या डोक्यावरची केस कापण्यात आले होते, भुवय्या देखील कापण्यात आल्या होत्या.जेणेकरून पोलिसांना तिची ओळख पटू नये. तसेच तरूणीवर बलात्कार करून तिचा मृतदेह पाण्यात फेकून देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हा संपूर्ण घटनाक्रम पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी .या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.(neelima chavan missing death police investigate the case ratnagiri chiplun crime story)

घटनेचा तपास 12 ऑगस्ट पर्यंत न झाल्यास 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा नाभिक समाजाने दिला आहे. 

      अशाच Latest Updates करिता itsmarathi.com च्या Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा...!

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने