हवामान अंदाज लाईव्ह : राज्यात मुसळधार पाऊस कधी पडणार आहे ?
हवामान अंदाज :
जुलै महिन्याच्या शेवटी जोरदार पडलेला पाऊस आता ऑगस्ट महिन्यामध्ये गायब झालेला आहे . राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. तर काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र पावसाळा सुरू असताना जोरदार पाऊस कधी पडणार ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा हवामानाचा अंदाज तुमच्यासाठी हवामान खात्याने याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. (जोरदार पाऊस कधी पडणार - हवामान अंदाज )
![]() |
हवामान अंदाज लाईव्ह : राज्यात मुसळधार पाऊस कधी पडणार आहे ? |
मुसळधार पाऊस कधी पडणार ?
हवामान विभागाने काढलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात देखील पावसाची स्थिती अशीच असणार आहे. काही भागांमध्ये कमी पाऊस असेल तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. मात्र जोरदार पावसाची वाट पाहणाऱ्यांना 18 ऑगस्टपर्यंत वाट पाहायला लागू शकते असा अंदाज हवामान विभागाने सांगितलं आहे.
राज्यामध्ये १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने काढली आहे. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये राज्यातील मराठवाडा आणि विदर्भसह अन्य जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे असे पण सांगितले आहे . यानंतर अनेक जिल्ह्यात उघडीप दिलेला पाऊस पुन्हा पडायला सुरुवात करेल असा देखील अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
२५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राज्यात पुन्हा काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याला आहे. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये नेहमी पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीमध्ये महाराष्ट्र मध्ये मोठा पाऊस पडणार नसून बऱ्याच ठिकाणी थोड्या सरी बसणार आहेत.
तुमच्या गावात पाऊस कधी मुसळधार पडणार?
जशे तंत्रज्ञान बदलते तसे आपल्याला देखील बदलणे गरजेचे आहे. याचाच विचार करून आम्ही खास शेतकऱ्यांसाठी एक इट्स मराठी हवामान अंदाज हे ब्लॉग section बनवले आहे. या section च्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आणि मोफत रोजचा हवामान अंदाज पाहू करू शकता. यामध्ये तुमच्या गावात कधी मुसळधार पाऊस पडणार? याबाबत देखील तुम्हाला माहिती घरबसल्यावर मिळेल. त्याचबरोबर तुम्ही या ब्लॉग च्या माध्यमातून आयुष्य बदलणारे विचार, सरकारी योजनांची माहिती घेऊ शकता.... शकतात्याचबरोबर शेतमालाचे रोजचे बाजारभाव update पाहू शकता अशा अनेक गोष्टींची माहिती तुम्ही घेऊ शकता. आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Its marathi ला Join व्हा...!
हवामान अंदाज नेहमी आपल्या फोन - Youtube वर पाहण्यासाठी चॅनेल ला Subscribe करायला ही विसरू नका...!
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.