Breaking News: सुप्रसिद्ध आर्ट डायरेक्टर नितिन देसाई यांची आत्महत्या
मुंबई : देवदास, लगान सारख्या चित्रपटांमार्फत बॉलीवूड हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे सुप्रसिद्ध मराठमोळे कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आज आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.
![]() |
Breaking News: सुप्रसिद्ध आर्ट डायरेक्टर नितिन देसाई यांची आत्महत्या ! धक्कादायक ! |
कर्जत मधील एनडी (ND STUDIO) स्टुडिओमध्ये गळफास घेऊन नितीन देसाई यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं.
मराठी सोबतच हिंदी चित्रपटांसह अनेक भव्यदिव्य कार्यक्रमांसाठी भव्य असे सेट उभारणारे कला-दिग्दर्शक म्हणून त्यांची संपूर्ण देशभर कीर्ती होती.
वयाच्या 58 व्या वर्षीच त्यांनी आयुष्याची अखेर केली.
नक्की - नेमकं घडलं काय?
कर्जत मधल्या एनडी स्टुडिओच्या जवळच नितीन देसाई यांनी स्वतःसाठी एक छोटंसं घर बांधलेलं होतं . गेल्या दोन दिवसांपासून देसाई तिथेच मुक्कामी राहत होते.
कुटुंबीय देसाईंना सारखे फोन कॉल्स करत होते, मात्र ते कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने शेवटी घरच्यांनी एनडी स्टुडिओच्या कार्यालयात कॉल केला.
स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराजवळ जाऊन पाहिलं, मात्र, आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर दरवाजा तोडून प्रवेश करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावेळी दुर्दैवाने एनडी स्टुडिओच्या कर्मचाऱ्यांना नितीन देसाई खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
लगेच पाठोपाठ स्थानिक पोलिसांची टीम, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं. नितीन देसाईंच्या या आत्महत्येचं नेमकं कारण काय, हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही.
इतक्या टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत शेवटच्या क्षणी त्यांच्या डोक्यात नेमकं काय विचार येऊन गेले असावेत, त्यांच्या मनाची अशी काय आणि का अवस्था झाली याची चर्चा त्यांच्या स्वकीयांमध्ये रंगल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच एनडी स्टुडिओमध्येच नितीन देसाईंच्या लेकीचा भव्य लग्न सोहळा पार पडल्याची चर्चा आहे तर नितीन देसाईंचा मुलगा अमेरिकेत राहत असल्याची माहिती आहे.
नितीन देसाई कोण होते?
मुंबईतल्या सर जे. जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर नितिन देसाई यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
1987 वर्षीपासूनच त्यांची चित्रपट जगतातील कारकीर्द सुरू झाली.
'1942 अ लव्ह स्टोरी' या लोकप्रिय सुंदर अशा चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले.
त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' यासारख्या प्रमुख लोकप्रिय चित्रपटांचं कला दिग्दर्शन त्यांनी केले होते.
सुमारे वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी यांसारख्या प्रमुख दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलेलं आहे.
नितीन देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांनी पटकावला आहे.
2005 मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळच कर्जत या ठिकाणी 52 एकर (21 हेक्टर) मध्ये पसरलेला एनडी स्टुडिओ सुरु केला होता. जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल यांसारखे चित्रपट आणि कलर्सचा रिऍलिटी शो बिग बॉस देखील त्यांनी होस्ट केले होते .
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.