ऑनलाईन युगात बऱ्याच वेळा सोशल साईट्स च्या माध्यमातून आपण बऱ्याच अनोळखी लोकांशी जोडले जातोत. त्यात आपल्या कोण किती फायद्याचा कोण किती हानिकारक हे आपल्याला कळतंच नाही. त्यामुळे कोणाशीही तितकेच संबंध ठेवावेत जितके आपल्याला  केव्हाही तोडता येतील याचाच प्रत्यय देणारी घटना आज नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे घडली.

धक्कादायक... सेकसकाॅर्शनच्या धमकीमुळे - नंदुरबार मध्ये युवकाची चक्क आत्महत्या!
धक्कादायक... सेकसकाॅर्शनच्या धमकीमुळे - नंदुरबार मध्ये युवकाची चक्क आत्महत्या!

रनाळे येथील एका युवकाला एका व्यक्तीने स्वतः पोलिस असल्याचे सांगत तुझे अश्लील व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करेन आणि तुला प्रचंड बदनाम करेल अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली.

पैशे दिल्यानंतर देखील हळूहळू  व्हिडीओ प्रसारित करायचे नसतील तर परत पैसे पाठव म्हणून त्यास सांगितले जात होते. त्यानुसार त्याने सुमारे 38 हजार 999 रुपये संबंधितांच्या फोन पे अकाउंटमध्ये पाठवले देखील.

तरी काहीही केल्या त्यांनी मानसिक त्रास देत पैसे मागविण्याचं थांबवलंच नाही त्यामुळे शेवटी 24 वर्षीय युवकाने या त्रासाला कंटाळून शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अशात असे प्रकार बरेच वाढले आहेत त्यामुळे समोरील व्यक्ती खरंच विश्वास पात्र आहे का? असेल तरी आपण जे कृत्य करत आहोत ते भविष्यात आपल्यालाच धोकादायक ठरू शकतं का याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी ! 

     अशाच ताज्या घडामोडी आणि  Marathi Breaking News  मनोरंजन ज्ञान आणि माहिती साठी आपला ग्रुप नक्की जॉईन करा....!

https://chat.whatsapp.com/LQ2we4k9QvlBeVu7baVNqEPost a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने