" A Little Life "

हे जवळपास साडेसातशे पानांचं असलेले, एक विध्वंसक सुंदर अन् आश्चर्यकारकपणे आधुनिक अभिजात पुस्तक/कथा आहे.

हे निश्चितपणे सोपं वाचन तर अजिबातच नाहीये. खूप जणांनी यावर negative review मांडले आहेत. हे सांगून की, या पुस्तकातील कथा ही खूप depression mode मधली आहे. पण यात असेही बरेच काही गोष्टी आहेत जे आपण नक्कीच positive way ने घेऊ शकतो. शेवटी आपल्यावर असतं की एखाद्या पुस्तक मधून, एखाद्या कथेतून आपण काय घेयचं आणि काय नाही घेयचं. आपण स्वतः आपल्यासाठी हे ठरवायचं असतं की आपल्याला यातून स्वतःसाठी सकारात्मकता घेयची आहे की नकारात्मकता.

A Little Life  Book Review In Marathi - itsmarathi
 A Little Life  Book Review In Marathi - itsmarathi

या पुस्तकात, कथेद्वारे चित्रित केलेलं अगदी प्रत्येक पात्र, प्रत्येक भावना, प्रत्येक विचार आणि प्रत्येक नातं इतकं तीव्र स्वरूपाचं आणि अपूर्णपणे सुंदर मांडलं आहे की बस. मनाच्या खोलवर वसलेली वेदना किंवा पात्रांद्वारे व्यक्त केलेला निखळ आनंद, आपल्या स्वता:च्या मनाच्या गाभ्याशी देखील प्रतिध्वनित होतो. यात दाखवलेल्या काही पात्रांमधील प्रेम हे आपल्यासाठी खरोखरच एक प्रेरणादायी आदर्श बनतो, अगदी बिनशर्त आणि परस्पर वास्तविक. आपला भूतकाळ आणि त्यानंतरच्या जीवनातील आपण केलेल्या निवडींचा आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या जीवनावर देखील कसा परिणाम होतो हे यात उत्तम दर्शविले आहे. जीवनातील संघर्षांबद्दल, तसेच मैत्री, नातेसंबंध आणि त्यांच्यातील गुंतागुंतीबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करून, मानवी भावनांची गुंतागुंत या पुस्तकात अगदी स्पष्टपणे मांडली आहे.

शारीरिकपेक्षा, मानसीक आघात most of the time इतरांद्वारे दुर्लक्षित केले जातात आणि ही कथा याच वस्तुस्थितीचा पुरावा देते की, शारिरक असो वा मानसीक, कोणताच आघात कधीही कमी लेखला जाऊ नये. या पुस्तकाने मला निःशब्द केलं आहे. ही कथा व्यसन, हृदयविकार, मैत्री, साथ, दुरावा, प्रेम, नैराश्य, हानी, मानवी तस्करी, आत्महत्या, पीटीएसडी (post traumatic stress disorder), स्वत:ला हानी पोहचवणे, चिंता, गैरवर्तन, हल्ला आणि बरेच काही गोष्टींविषयी माहिती देते. या पुस्तकाने त्या खोल आणि गडद विषयांना प्रकाशात आणले आहे ज्याबद्दल लोकांना बोलणे कठीण जाते. ज्याबद्दल बोलताना लोकं खूप विचार करतात. त्यावर बोलतानाही कचरतात. पुस्तकात असे काही मुद्दे आहेत जे वाचणे निश्चितपणे असह्य जाते आणि इतर काही मुद्द्यांबद्दल थोडी असंतुष्टताही वाटते. या पुस्तकात जे काही घडते ते सर्वच काही न्याय्य आहे असे मी अजिबात म्हणत नाही, आणि म्हणूनच हे वाचणे इतके अवघड आहे.

कथा सुरू होते चार मित्रांपासून, ज्यांची खूप मोठी मोठी स्वप्नं असतात. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ते चौघेही छोट्या गावातून न्यूयॉर्क सारख्या मोठ्या शहरात येतात. आणि ते आपल्या स्वप्नांना पूर्णही करतात. सुरवातीच्या साधारण २०० पानांमध्ये फक्त या चारही पात्रांबद्दल इतकी सखोल माहिती दिली आहे की, असं वाटतं की हे आपलेच जवळचे मित्र आहेत. आणि पात्रांच्या या सखोल माहितीमुळेच २०० पानांनंतर त्यांच्यासोबत ज्या काही घटना घडत जातात त्यासोबत आपण एका parallel line मध्ये एकदम correlate होऊन जातो.

यातील पहिलं पात्र Jude St. Francis आहे. jude च वकील बनण्याचं स्वप्न असतं. २०० पानात वर्णन केलेल्या पात्रांच्या माहितीमध्ये jude बद्दल अधिक माहिती दिलेली नाहिये. jude बद्दल खूप कमी माहिती सांगितली आहे. परंतु, जशी जशी कथा पुढे सरकते, तसं तसं एक एक करून jude च्या भुतकाळाबद्दल back story सांगितली जाते. उदाहरण, वर्तमानकाळात तो एखाद्या गोष्टीवर ज्याप्रकारे react होतो, तर त्याच्या तसं वागण्यामागे काय कारण असतं हे back story द्वारे आपल्याला दाखवलं जातं. त्यामुळे २०० पानात वर्णन केलेल्या पात्रांच्या माहितीमध्ये आपल्याला हे कळतंच नाही की या कथेतील main hero हा jude च असतो.

दुसरं पात्र आहे Willem Ragnarsson. हे असं पात्र आहे जो आपल्या मित्रांची खूप काळजी घेतो, समाजाला challenges करत राहतो. जसं चार लोकं काय म्हणतील, मुलांनी असच केलं पाहिजे, मुलींनी असच राहिलं पाहिजे, याच वयात लग्न केलं पाहिजे इत्यादी. यासारख्या सर्व गोष्टींच्या तो विरोधात असतो. कथेत असे बरेच प्रसंग येतात जिथे willem ने त्याची मैत्री प्रामाणिकपणे परिभाषित केली आहे.

तिसरं पात्र आहे Malcolm Irvine. याला architect बनायचं असतं. जसं आपण विचार करतो की मी कोण आहे ? माझं अस्तित्व काय आहे ? मी काय करायला पाहिजे ? माझी आयुष्याकडून अपेक्षा काय आहे ? माझ्या हातून कोणतं चांगलं काम घडायला पाहिजे ? माझं भविष्य काय आणि कसं असणार आहे ? इत्यादी जे आपण विचार करत राहतो, malcolm च पात्रही यात असंच दाखवलं आहे.

चवथा पात्र आहे Jean Baptiste JB Marion. याला artist बनायचं असतं. याचा स्वभाव थोडा फटकळ असून तो एक drug addict असतो. पण आपल्या परिवाराची तो खूप काळजी करत असतो आणि तेवढीच खूप काळजी घेतही असतो. JB ने स्वतः तयार केलेल्या art work च वर्णन लेखनाने खूप कमाल पद्धतीने केलं आहे.

कथा जशी जशी पुढे जाते तस तसं एक एक जण या कथेच्या मुख्य frame मधून बाहेर पडू लागतात. राहतात फक्त jude आणि willem. नंतर willem देखील फ्रेम मधून बाहेर पडतो शेवटी राहतो तो फक्त jude. jude ज्याच्यावरतीच ही संपूर्ण कथा लिहिलेली आहे.

A Little Life  Book Review In Marathi - itsmarathi

क्रमांक २५० ते ३०० पानांच्या आसपास वाचन थोडं अवघड होत जातं, कारण ईथुन पुढे लेखक आपल्याला एक एक jude च्या भूतकाळातील back story दाखवून jude च्या वागण्या बोलण्यामागील कारण समजावत जातो. हे back story आपलं मन थोडं disturb करतात. jude handicapped असतो. jude च्या handicapped होण्यामागची back story इत्यादी सगळंच त्याच्याबद्दल आपल्याला तपशीलवार सगळं माहिती होऊ लागतं. मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की याच्या आयुष्यात हे एवढं सगळ काय काय सुरू आहे. जवळपास क्रमांक २५० ते ३०० पानं jude बद्दल लिहिलेली आहेत.

jude कायम विचार करत राहतो की, जीवनात जी चांगली, आनंदी लोकं आहेत, त्या लोकांना jude ला त्यांच्या आयुष्यात येऊ देयचं नाहिये. jude कायम विचार करत राहतो की, तो त्याच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद deserve करत नाही. याची कारणं त्याच्या back story मध्ये सांगितली जातात जे तुम्हाला पुस्तक वाचताना तपशीलवार समजेन. आणि हेच नकारात्मक विचार त्याच्या मनात खूप खोलवर रुतत जातात. अगदी पुस्तकाच्या शेवटीही jude हेच म्हणतो की तो त्याच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद deserve करत नाही.

पुस्तक वाचून झाल्यानंतरही आपल्या डोळ्यासमोर jude च्या back story मधून समजलेल्या त्याच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटनांचा चलचित्रपट सुरूच राहतो. child abuse, mentally and physically abuse. आणि त्याच्यासोबत घडलेल्या बाकी गोष्टीही, या सगळ्याच गोष्टींमुळे तो खूप जास्त depression मध्ये असतो.

jude या पात्रासोबत आपण अगदी mentally जोडले जातो. त्याला झालेला त्रास आपण स्वतः देखील feel करू लागतो. आणि कुठेतरी आपल्याही मनात विचार येतो की याच्या सोबत एवढं वाईट का झालं आणि का होतंय. आणि आता जेव्हा आपल्याला माहिती झालेलं असतं की jude सोबत इतकं काही झालेलं आहे, इतक्या साऱ्या गोष्टींमधून तो suffer होतोय, मग कुठे ना कुठेतरी आपल्याला असं वाटतं की याचे मित्र तर याला नक्कीच वाचवतील, त्याला यातून बाहेर काढतील, त्याची मदत करतील, त्याला साथ देतील. पण खरंतर reality खूप वेगळी असते.

कारण प्रत्येक वेळेस मित्र आपल्या प्रत्येक situation मध्ये हजर नाहि राहु शकत. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच वेळेस jude चे सगळे मित्र त्याला मदत करत असतातच, पण मित्र सुध्दा एका certain edge line पर्यंत आपल्याला साथ देऊ शकतात. jude च्या मित्रांनी त्याला कशा कश्याप्रकारे मदत केली ते कथेत स्पष्ट केलेलं आहे ते तुम्हाला पुस्तक वाचताना समजेल. कारण anxiety, depression सारखे इत्यादी जे अंतर्गत समस्या असतात, त्या गोष्टींसोबत आपल्याला स्वतःलाच तोंड देऊन, सकारात्मक राहून लढावं लागतं. आणि या कथेद्वारे लेखकाने हीच गोष्ट आपल्यासमोर मांडली आहे.

कथानक बऱ्यापैकी पुढे गेल्यावर या चौघांव्यतिरिक्त अजुन एक पात्र इथे जोडलं जातं. ज्याच नाव Harold Stein असतं. jude साठी jude च्या बाबतीत हे खूप महत्त्वाचं पात्र असतं. harold ला आपण jude चा god father देखील म्हणू शकतो. कारण कथेत एक क्षण असा येतो की जिथे harold, jude ला म्हणतो की, मी तुला दत्तक घेऊ इच्छितो. त्या क्षणाला jude रडतो. यावेळेस jude च वय ३० वर्ष असतं. दोघंही खूप emotional होतात. या कथेतला हा भाग मला खूप जास्त emotional वाटलं. आणि लेखकाने हा संपूर्ण seen मांडला पण खूप अप्रतिम आहे.

harold इथे त्याचा भूतकाळ सांगतो की, त्याचा पण एक मुलगा होता, ज्याच्यावर तो खूप प्रेम करायचा, त्याची तो खूप काळजी घेयचा, त्याच्यासोबत तो खूप आनंदी असायचा. harold च्या मुलाच्या जन्माच्या वेळेस harold ने आयुष्यात पहिल्यांदा भिती अनुभवली होती. आणि जेव्हा harold चा मुलगा expired झाला तेव्हा harold ची ती भितीही त्याच्या मुलासोबत निघून जाते, ती भिती नष्ट होते. आता हे असं का आहे याचं स्पष्ट रूप तुम्हाला कथेत वाचायला मिळेल.

एक असा क्षण येतो जिथे jude आणि harold एकमेकांना hug करायला पुढे येतात. पण कुठे ना कुठे jude चा जो भूतकाळ असतो, तो jude ला पुढे जाऊ देत नाही. मग jude विचार करतो की, harold ला माझा काही फायदा तर करून घेयचा नसेल ना ? माझा फायदा उचलण्यासाठी तर harold ला मला दत्तक घेयच नसेल ना? कारण जेव्हा आपण jude चा भूतकाळ बघतो तेव्हा, त्याच्या सोबत जे घटना घडले, किंवा त्याच्या सोबत जेव्हा पण काही चांगलं घडत होतं, किंवा जेव्हा पण त्याला कोणी मदत करू लागलं होतं, तेव्हा प्रत्येकाने त्याचा फायदाच उचलला होता, त्याचा वापरच करून घेतला होता. मग ते mentally असो किंवा physically. त्यामुळे jude च्या मनात ती प्रचंड भितीच निर्माण झालेली होती की, पुढे जाऊन harold सुध्दा jude चा फायदाच घेईल.

हा क्षण आपल्याला आतून खूप चिरून तोडून टाकतो आणि आपण आतल्या आत अगदी विखरून जातो आणि हाच विचार करू लागतो की, jude च असलेलं वय वर्ष ३० म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, हे खूप mutual वय असतं एखाद्या गोष्ट smoothly handle करण्यासाठी, एखाद्या गोष्टीतून बाहेर पाडण्यासाठी. आणि एवढं वय झालेलं असताना सुध्दा त्याचा भूतकाळ त्याचा पाठलाग सोडत नाहि. यावरून आपण विचार करू शकतो की, भूतकाळात jude सोबत किती extreme leval ला mentally आणि physically शोषण झालेलं असेल, ज्यामुळे वर्तमानकाळात jude सोबत काही चांगलं जरी घडत असेल, तरी jude भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करून पुढे जाऊ शकत नाही, पुढे जात नाही. एवढी त्याच्या मनात प्रचंड भिती निर्माण झालेली असते.

काही काळानंतर jude चा मित्र willem, jude च्या आयुष्यात पुन्हा येतो. willem च वय ४० वर्ष झालेलं असतं. आणि कुठे ना कुठे willem च्या मनात असे विचार येतात की, willem च्या मनात jude बद्दल अजूनही काहितरी भावना आहे. आणि willem या भावना jude ला सुध्दा सांगतो. आणि आता कुठेतरी थोडा happy phase सुरू होतो. पण एक मिनिट थांबा. हे जेवढं दिसतंय तेवढं आनंदी तर अजिबात रहात नाही. आता हे दोघं चांगल्या प्रकारे एकत्र राहू लागतात. पण अजूनही कुठे ना कुठेतरी jude चा भूतकाळ त्याला या relationship मध्ये पुढे जाऊ देत नाही. त्यांच्यात बरेचशे problems निर्माण होतात, ते दोघं मिळून त्या problems सोबत कसं लढतात ते सगळं या कथेत खूप छान वर्णन केलं आहे.

पण पुढे जाऊन काही काळानंतर willem चा accident होतो आणि त्या accident मध्ये willem expired होतो. jude पुन्हा back to the bottom ला येतो. willem मुळे jude च्या life मध्ये jude जे काही positive progress करू लागला होता किंवा आनंदी राहु लागला होता, jude च्या life मधलं हे सगळं willem सोबत निघून जातं. jude ला आता असं वाटू लागतं की त्याच्या आयुष्यात आता जगण्यासारखं, किंवा जगण्यासाठी काहीच उरलं नाहिये.

पुस्तकाच्या शेवटच्या क्रमांक १०० पानांमध्ये harold ची कथेत पुन्हा entry होते. आणि harold त्याची story सांगू लागतो. जेव्हा harold त्याची story सांगतो त्यावेळेस आपल्याला असं समजतं की willem expired झाल्यानंतर jude ने आत्महत्या केलेली असते. या शेवटच्या पानांमधली harold ने सांगितलेली story लेखकाने खूप intensely, खूप कमाल, खूप भावनिकरित्या वर्णन केलं आहे.

आणि या पुस्तकाचं जे शेवटचं पान असतं, त्यात jude ने लिहिलेलं पत्र असतं, जे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेलं असतं. त्यात jude ने लिहिलेलं असतं की, मी माझ्या आयुष्यात प्रेम आणि आनंद deserve करत नाही. यावरून आपण विचार करू शकतो की jude त्याच्या आयुष्यात किती आणि काय काय सहन करत आला होता. आणि अगदी शेवटपर्यंत तो हाच विचार करत राहिला.

या कथेची सगळ्यात विशेष गोष्ट ही आहे की यात चारही पात्रांना त्यांचे विचार मांडण्याची संधी दिली आहे. म्हणजे एखादी गोष्ट असेल तर ती प्रत्येकाच्या point of view ने ती गोष्ट मांडली आहे. म्हणजे प्रत्येक पात्र त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला कथा सांगत असतो.

आपण म्हणतो आयुष्य खूप अनमोल आहे, जगा सदा सर्व सुखी असा कोण ? म्हणून आत्महत्या हा कोणत्याच गोष्टीसाठीचा पर्याय असुच शकत नाही. जे अगदीच खरं आहे. मी सुध्दा याला सहमत आहे. पण, एखादी दुर्धर गोष्ट यासाठी अपवाद असू शकते. मी आत्महत्या सारख्या गोष्टींचं समर्थन अजिबात करत नाहीये. मी फक्त नाण्याला जसे दोन बाजू असतात तसचं ही बाजू सांगितली आहे की, क्वचितच एखाद्याच्या बाबतीत असं असू शकतं की, एखादी गोष्ट इतकी दुर्धर असते की ती व्यक्ती हा पर्याय निवडते.

पण तुम्हीच तुमचं स्वतःचं देखील आणि आजूबाजूचही परीक्षण करा. आपल्याकडे जेव्हा कोणाला नैराश्य आलं आहे असं म्हटलं की समाज लगेच त्याची थट्टा उडवतो. त्याला जेव्हा मानसोपचार तज्ञाकडे जाऊन उपचाराची घेण्याची गरज असते आणि तो स्वतः जर डॉक्टरांना consult करतो म्हणत असेल तर लोक त्याला म्हणतात "तू पागल झाला आहे का ?" त्या व्यक्तीला असं म्हणून अजूनच त्याला खचवलं जातं. एक तर नैराश्य हा मानसिक आजार आहे आणि त्यावर उपचारही आहेत. हे मान्य करायला अजुन आपला बराच समाज तयार नाही.

लहानपणापासूनच मुलाला स्पर्धा करायला शिकवले जाते. मुलांनी फक्त यशस्वीच होण्याचा अट्टाहास तुम्ही करतात. पण त्याच क्षेत्रात प्रत्येक जण ती स्पर्धा परीक्षा यशस्वीच होईल याची काही शाश्वती नसतेच. आणि जीवन काही स्पर्धा नाही. आणि सगळ्यांनाच chichore movie मध्ये दाखवल्या प्रमाणे सुशांत सिंह सारखा वडील नशिबी नसतो, जो आपल्या मुलाला नैराश्यातून बाहेर पडायला मदत करेल. आणि म्हणूनच खरंतर प्रत्येकाने आपला एक back up plan ठेवायलाच हवा. समस्या म्हटलं की त्यामागचं कारण, उत्तर आणि समाधान हे आलंच. एक ना एक दिवस, हे पण दिवस जाणार असा एक आशावाद प्रत्येकामध्ये कायम असायला हवा.

आता तुम्ही म्हणाल की, मी असं का म्हणाले की, आत्महत्या साठी एखादी दुर्धर गोष्ट अपवाद असू शकते. तर यासाठी मला हेच म्हणायचं आहे की, एखाद्या व्यक्तीला आत्महत्या सारखा निर्णय का घ्यावसा वाटतो ? माझ्या मते तरी कमी असलेला संवाद आणि त्यांना न मिळालेली साथ. अगदी फार मोठ्या प्रमाणात नाही पण आपल्या आसपासच जरी आपण काही लोकांच्या मनात ते आपल्यासोबत संवाद साधू शकतात, निश्चिंत होऊन आपल्यासोबत बोलू शकतात हा विश्वास जरी त्यांच्या मनात निर्माण करू शकलो तरी अश्या लोकांना खूप मोठी मदत होते.

मान्य आहे की प्रत्येकाच्या मनातलं नाही कळू शकत आपल्याला पण कोणीतरी स्वतःहुन आपल्याला येऊन बोलेल इतका विश्वास तरी आपण त्यांच्यात नक्कीच निर्माण करू शकतो. त्यासाठी काय करावं, कसं वागावं हे स्वतःलाच विचारलं तर उत्तर पण नक्की मिळेल. आपण आपल्या आसपासच्या माणसांना जरी नैराश्यातून बाहेर काढू शकलो तरी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी त्या व्यक्तीने अगदी टोकाला जाण्याची आपण वाट बघण्याची गरजच नाही. आपण नेहमीच त्यांच्या सोबत आहोत, त्यांना ही जाणीव करून देणं मुख्य गरजेचं असतं.

आत्महत्या करणारे भ्याड असतात असंही मला अजिबात वाटत नाही. या निर्णयाच मी समर्थनही अजिबात करत नाही. आत्महत्या हे चुकीचं आहेच पण त्यांची मनस्थिती समजून घेऊन त्यांना मदत करणं हे खरं गरजेचं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती असतात. प्रत्येक जण वेगळा असतो. तशी त्याची शारीरिक आणि मानसिक क्षमताही वेगळ्या पातळीची असते. प्रत्येकाची समस्या वेगळी, त्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा, त्यामुळे त्यांना भ्याड म्हणणे हीच आपली पहिली चूक ठरते त्यांना आत्महत्या गोष्टीकडे ढकलण्यासाठी. आपल्याला जरी काही गोष्टी शुल्लक वाटत असल्या तरी त्यांच्या बाजूने त्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. अशावेळी एखाद्याला जर जगायची ईच्छा नाहीये असं वाटत असेल तर त्याला असं वाटणं हे चूक नाहीये हे आपण देखील पहिलं मान्य करायला हवं.

संवादात चांगला श्रोता होणं महत्वाचं असतं. समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं गरजेचंच नसतंच. समोरच्याच पहिले फक्त ऐकून घेता यायला हवं आपल्याला आणि ते समजून घेतलं तर खूपच भारी मग. समोरच्याला फुकट सल्ले आणि दूषण द्यायला सगळे तयार असतात. आणि मनातलं बोला म्हणणारेही आहेत बरेच, पण मी ऐकायला तयार आहे असं म्हणणारे आणि खरंच ऐकून घेणारे किती आहेत ?

a little life हे खरंच भावना प्रवृत्त करणारं, हृदय पिळवटून टाकणारं पुस्तक आहे. सर्वात दुःखद क्षण हे सर्वात हिंसक नसतात, परंतु कोमल असतात. जेथे jude ला त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांकडून सतत प्रेम मिळते. jude त्याच्यासोबत झालेले आघात आणि वेदना आणि आत्मद्वेष आणि भावनांना तोंड देण्यासाठी ज्या प्रकारे संघर्ष करतो, तर willem आणि harold त्याला शक्य तितकी मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात ते खूप सुंदर वर्णन केलं आहे. आणि शेवटी शोकांतिकेचे मूल्य मांडले आहे. ज्या गोष्टीने मला सर्वात जास्त त्रास दिला ती गोष्ट म्हणजे willem च्या मृत्यूनंतर, jude ची प्रगती आणि आनंद देखील willem सोबत मरून जातं. jude स्वभावाने आणखीन जास्त कटू, रागावलेला आणि निर्दयी होतो. आणि ३ वेदनादायक वर्षे टिकून राहण्याचा आणि जगणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर, jude इतर लोकांसाठी दररोज जिवंत राहणे निवडण्याच्या सततच्या कष्टाचा सामना करू शकत नाही आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो.

जीवन हे नेहमीच वेदनादायक आठवणींपासून सुटण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. पण भूतकाळात खूप तुटलेल्या आणि छळलेल्या एखाद्यासाठी, जिवंत राहणे म्हणजे काय, वेदना होणे म्हणजे नक्की काय ? आयुष्य आपल्यासाठी खरंच अजून जगण्यालायक आहे का ? हे पुस्तक वाचताना मन अत्यंत क्लेशदायक होते. शेवटी मला स्वतःलाच शारीरिकदृष्ट्या सुन्न वाटले. एखाद्या अपरिहार्य गोष्टीचा सतत गडद आवर्त जिथे तुम्ही आशा ठेवता, परंतु स्वत:ला हे जाणून घ्या की त्यातून सुटका नाही.Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने