तुमच्या व्यवसाया मधले हे 6 Key Componants पक्के आहेत का ?

एखादा व्यवसाय छोटा असो किंवा मोठा व्यवसायाची मूळ तत्वे ही प्रत्येक ठिकाणी सेव आहेत फक्त फरक हा आहे की व्यवसाय हे अतिशय यशस्वी होतात ते व्यवसाय या कंपोनेंट्स वर काम करतात या मुद्द्यांवर काम करतात या घटकांकडे नीट लक्ष देतात आणि जे व्यवसाय नुकसानीत जातात ते काय करतात हे काय फार मोठं सांगायची गरज नाही. 

तुमच्या व्यवसाया मधले हे 6 Key Componants पक्के आहेत का ?
तुमच्या व्यवसाया मधले हे 6 Key Componants पक्के आहेत का ?

📌 (1) Vision

आपण कोणताही व्यवसाय फक्त पैसा कमवायचा म्हणून सुरू केला तर तो व्यवसाय खूप मोठा होईल त्याची भरभराट होईल तो एक यशस्वी व्यवसाय म्हणून गणला जाईल याचा विचार सुद्धा मनात आणू नका.

व्यवसाय करण्याचं हे सगळ्यात कमी दर्जाचं किंवा फालतू कारण आहे

जगातला कुठलाही व्यवसाय उचलून बघा ,कोणताही व्यवसाय आपलं ध्येय हे पैसा कमावणे असा ठेवत नाही.

पैसा हा बाय प्रॉडक्ट आहे,आपली व्यवसायाप्रती निष्ठा जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे घेऊन येते, आणि ते ग्राहक येताना पैसे घेऊन येतात, त्यामुळे आपल्या व्यवसायाची विजन मोठी ठेवा, आणि ती आपल्या कर्मचाऱ्यांकडून पाठ करवुन घ्या. प्रत्येकच,कंपनी संस्था,NGO ही Vision वर चालते. ही गोष्ट क्लीअर असणं फार फायद्याच आहे

 📌 (2) People 

_आपण एक विजन घेऊन व्यवसाय तर चालू केला,पण आपल्या अवतीभवती नकारात्मक विचारांनी भरलेली लोकं असतील तर ? आपण भलेही उत्साही असू, पण आपले कर्मचारी किंवा पार्टनर  व्यसनी,आळशी, भेकड, स्वार्थी, कपटी असतील तर? आपण आपल्या व्यवसायाचे ध्येय गाठूच शकत नाहीं

त्यामुळे अशी माणसं निवडताना,फिल्टर लावा, अशाच लोकांच्या संगतीत राहा, जे आपल्याला पुढे नेतील
जे आपल्या ध्येयात सामील होतील,

आपण, बाहेर बघू शकतो कि,केवळ संगतीमुळे माणसं किती बदलतात,

we should surround us with great people हा दुसरा key Componentआहे.


📌 (3)  Data

आपल्याकडे चांगली Vision आहे, कामासाठी, सपोर्ट करण्यासाठी आणि आपलं ध्येयं साध्य करण्यासाठी योग्य माणसं आहेत, तर पुढची गोष्ट अशी कि,आपल्याला आपल्या स्वतःच्या क्षेत्रात नेमकं काय चाललंय?हा डाटा ही माहिती सतत मिळाली पाहिजे,किंवा आपण ती मिळवली पाहिजे.
आजकाल डाटा हीच पॉवर आहे_ बारावीला असताना, Oceansat नावाचा एक उपग्रह सरकारने सोडला होता, त्यावेळी त्यासाठी बराच खर्च आला होता, ज्याची बरीच चर्चा पण झाली.
मलासुद्धा त्यावेळी वाटलं होतं कि, हा पैशाचा अपव्यय आहे, "काय गरज आहे असे सॅटेलाईट सोडायची? ''

पण नंतर लक्षात आलं,कि सॅटेलाईट अतिशय महत्वपूर्ण असा डेटा पुरवतात,जो फार महत्वाचा असतो

तसंच सेम टू सेम

व्यवसायात पण डेटा अतिशय महत्वाचा असतोय, जिथून मिळेल तिथून उचला.

📌 (4)  issues 

 एकदा का, Vision, people ,Data हे तीन कॉम्पोनन्टस स्पष्ट झाले कि, पुढचा घटक आहे, issues जी लोकं आपल्या व्यवसायात काम करताहेत त्यांच्यात समन्वय पाहिजे आहे, जिथे कुठे वाद होतील, म्हणजे issues होतील,ते कसे  निपटायचे?याची एक स्पष्ट पद्धत हवीये.

अशी एक प्रक्रिया असली कि, मोठे प्रॉब्लेम होत नाहीत, आणि जरी असे प्रॉब्लेम झाले तरिहीते आपण सहजपणे निपटू शकतो.

📌 (5) Process


एखादा व्यक्ती व्यवसाय चालू करतो दोन चार वर्ष तो एकटाच वेगवेगळे प्रयोग करत असतो. मग त्या अनुभवाच्या जोरावर, त्यांनी एक स्पष्ट प्रोसेस दिसायला लागते,कि अशा पद्धतीने गेलं? तर यश मिळतय, मग ती पद्धत लिहुन काढली जाते.

आता व्यवसायात नवीन पिढी, कर्मचारी कुणीही आलं तरिही त्यांना ही प्रोसेस शिकवली जाते, ज्यामुळे सेम रिजल्ट येतात. तर ही प्रोसेस आवश्यक असते. येवले नी जर,चहा बनवायची प्रोसेस बनवली नसती,तर त्यांना एवढं मोठं एक्सपान्शन करणे शक्य झालं नसतं.

या कारणासाठी हा पाचवा घटक अत्यावश्यकच आहे

📌 (6) Traction


या वरच्या मुद्दयानंतर येतो, तो ट्रॅक्शन पायाला वात झाला असेल किंवा हाडाच्या इतर काही समस्या असतील तर डॉक्टर ट्रॅक्शन चा सल्ला देतात  ताण कंट्रोल्ड ताण,सहन होईल इतकाच.

असा ताण,शिस्त,प्रत्येक व्यवसायात आवश्यक असतेच,नाही तर सगळा येड्याचा बाजार होऊन जाईल .

ही शिस्त... अगदी Day-1 पासून आणली,ती स्वतः सुद्धा नीट पाळली तर आपले कर्मचारी पाळतील, नाहीतर विचका व्हायला वेळ लागत नाही. मराठी व्यावसायिकांच्या व्यवसायात या प्रोफेशनलीजम ट्रॅक्शनची कमतरता नेहमीच दिसते. कर्मचाऱ्यांना कसं वागवायचं?याच्यावर पुढे अनेक लेख देणारंच आहे, परंतु इथे समजून घ्या, ट्रॅक्शन ठेवलं तरच व्यवसाय नीट वाढतो नाही तर सर्कस.

"या बाबी आपल्याला अभ्यासायच्या आहेत, ज्यामुळे आपण सगळा पसारा नीट हाताळू शकतो...!"

✅ आपल्या आर्थिक सजगतेसाठी Its Marathi ला जॉईन व्हा 👉  https://chat.whatsapp.com/LQ2we4k9QvlBeVu7baVNqE

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने