'द आंत्रप्रन्योर'-शरद तांदळे 










लेखकांनी एवढ्या सोप्या आणि साध्या शब्दात आपला एकंदरीत संघर्षमय,वास्तववादी व प्रेरणादायी जीवनप्रवास कुठलेही बंधन न ठेवता मांडला आहे की जो वाचत असताना आपण थोड्या वेळासाठी सुद्धा पुस्तक खाली ठेऊच शकत नाही.देशात प्रचंड बेरोजगारी वाढल्यामुळे तरुणांत नैराश्य खूप वाढलेला आहे.तरुणांनी नौकऱ्यामागे न लागता आपला स्वतःचा एक उद्योग सुरू करून इतरांना सुद्धा उद्योजक बनण्यासाठी प्रेरित करावे.जेणेकरून बेरोजगारी कमी करण्यासाठी आपली सुद्धा काही मदत होईल.आणि या विषयावर द आंत्रप्रन्योर हे पुस्तक जबरदस्त पद्धतीने मार्गदर्शन करते.शरद सरांच्या आयुष्यातील अनेक पैलू आपल्याला माहिती होतात आणि हा माणूस एवढा डाउन टू अर्थ कसा काय राहू शकतो  यामागचं उत्तर आपल्याला या पुस्तकात मिळतो.


तसे तर उद्योजकता या विषयावर व उद्योजक बनण्यासाठी काय करावे ?? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत पण नेमकं यशस्वी उद्योजक बनण्यासाठी काय करू नये ?? या विषयावर कृतीतून व आपल्या अनुभवातून उत्तर सांगणारे हे पुस्तक एकमेव असेल.आपल्या आयुष्यातील जीवनप्रवासाबद्दल सांगत असतानाच लेखकांनी तरुणांना अचूक काही कानमंत्र दिले आहेत जे अनेकांना खूप फायदेशीर ठरतील.हे पुस्तक तुम्हाला फक्त उद्योजक बनायचं शिकवत नाही तर उद्योजक बनून इतर उद्योजक घडवण्यासाठी प्रेरित करते."वारसा असण्यापेक्षा आपल्याजवळ आरसा असणं महत्वाचं. असा आरसा, ज्यात पाहून अपल्याला स्वतःशी बोलता आलं पाहिजे. जो स्वतःशी चांगला संवाद करू शकतो तोच इतरांशीही चांगला संवाद करू शकतो. स्वतःशी होणारा एकांतातील संवाद हा आयुष्यात इच्छित यश मिळवून देईल.यासारखे अनेक जीवनोपयोगी मूलमंत्र देत लेखकांनी त्यांना प्रत्यक्ष  अनुभवातून आलेला शहाणपणा वाचकांच्यासोबत शेअर केलेला आहे जो येणाऱ्या काळात अनेक उद्योजक घडवल्या शिवाय शांत बसणार नाही..


मला खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या एकंदरीत जे काही प्रश्न माझ्या मनात घुमत होते त्याचे उत्तर लेखकांनी या पुस्तकातून दिले आहे.जसे की संघर्ष, मेहनत,पैशाची बचत,वेळापत्रक, वाचनाचे महत्व, शिकून सुद्धा व्यवसाय करण्याची लाज बाळगणे ,उद्योगासाठी लागणारे कागदपत्रे,पैशांचा अपव्यय, कायम जमिनीवर पाय इत्यादी भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे लेखकांनी दिलेली आहेत.


 पुस्तकाची रूपरेषा अगदी थोडक्यात :-


कथा आहे बीड जिल्ह्यातील शरद तांदळे या युवकाची.बारावी नंतर औरंगाबाद येथील महाविद्यालयातुन फक्त नावापुरती मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेची पदवी घेऊन नौकरी न मिळाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी.जेमतेम तीन महिन्यानंतरच आपली लायकी लक्षात आल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून पुणे येथील एका कंपनीत ५ हजार रुपये महिन्याचा जॉब.पुन्हा हा जॉब सोडून दुसऱ्या चांगल्या नौकरीच्या शोधात व याच कालावधीत इकडे-तिकडे मारलेले हातपाय.एवढं करून सुद्धा पदरी पडलेले अपयश मग यातून नैराश्यात रवानगी. यातून बाहेर पडण्याची धरपड,यशासाठी केलेले विचित्र प्रयोग, व्यवसन व बरंच जे लेखकांनी या पुस्तकात मांडलेलं आहे.सतत आलेल्या अपयशातूनच सुरू होतो प्रवास एका नवीन मार्गाकडे आणि तो मार्ग असतो #द_आंत्रप्रन्योर बनण्याचा. खेड्यातून थेट लंडनपर्यत मजल मारण्याचा हा प्रवास आपल्याला हसवतो,रडवतो,भावुक करतो,विचार करायला भाग पाडतो,मार्गदर्शन करतो आणि खूप खूप काही नवीन शिकवतो.आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलतो."


आज जो व्यक्ती यशाच्या शिखरावर आहे त्यामागे त्याने केलेली खूप मेहनत आहे आणि तो सध्या सुद्धा मेहनत करत असतो "त्यामुळे मेहनतीला लाजू नका आणि आयुष्यात नेहमी सकारात्मक राहून आपल्याला ध्येयाकडे वाटचाल करा ही शिकवण हे पुस्तक देते त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात हे पुस्तक एकदा तरी नक्कीच वाचावे ✍️


✍️शेवटी या पुस्तकातील मला आवडलेले काही विचार :-


१)बापाचे अश्रू ज्याला जपता येतात त्याच्यापासून यश लांब नाही (या वाक्याला मी जगातील सगळ्यात मोठं मोटीवेशनल वाक्य म्हणेल) आपण स्वतःला काय समजतो यापेक्षा आपला बाप आपल्याला काय समजतो हे जास्त महत्वाचं.


२)आयुष्यात चांगले मित्र मिळवण्यासाठी आपल्यालाही कुणाचातरी चांगला मित्र होणं गरजेचं असत..


३)वारसा असण्यापेक्षा आपल्याजवळ तो आरसा असणं महत्वाचं ज्यात पाहून आपल्याला स्वतःशी बोलता आलं पाहिजे.


४)संघर्ष व परिस्थितीशी लढण्यात जो आनंद आहे तो आनंद इतर कशातही नाही..


५)आयुष्यात उगाच टुकार मित्रांची गर्दी काही कामाची नाही जीवाला जीव देणारे नसले तरी चालतील पण योग्य सल्ला आणि दिशा दाखवणारे दोन-चार मित्र असावेत...नसतील तर शोधून त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे..


©️ Moin Humanist✍️

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने