महायोध्दा अंबालक्ष्मी |mahayodha ambalaxmi book by nitin thorat

काही दिवसांपूर्वी नितीन थोरात लिखित "महायोध्दा अंबालक्ष्मी"ही 'कैलाशवंशी सिरीज'मधील दुसरी कादंबरी वाचून पूर्ण केली.पौराणिक कथांचा मान राखत त्या कथांना कल्पनेची जोड देत लिहिलेली कैलाशवंशी या पुस्तक सिरीज मधून लेखकांनी पौराणिक कथेतील देवतांना मानवी रूप देण्याचं प्रयत्न केलं आहे.या सिरीज मधील पहिल्या कादंबरीत आपल्याला 'खंडोबाचा'जीवन प्रवास अनुभवायला मिळतो तर दुसऱ्या कादंबरीत 'अंबालक्ष्मी'या दोन्ही बहिणींच्या शौर्याची व अफाट कर्तृत्वाची गाथा अनुभवायला मिळते.ही कादंबरी आपल्याला भूतकाळात घेऊन जाते.जी वाचत असताना जणू आपण अंबालक्ष्मीच्या सहवासात वावरतोय असं वाटतं राहते.सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कोठेही कंटाळवाणी न वाटता वाचकांना पूर्णपणे गुंतवून ठेवण्यात ही कादंबरी कमालीची यशस्वी होते.

महायोध्दा अंबालक्ष्मी
महायोध्दा अंबालक्ष्मी 

यातील अंबा,लक्ष्मी,आदित्य,करवीर,कोल्हासूर,क्षात्रवेद आणि काही इत्यादी पात्रे आपल्याला आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा कथानक आपल्यासमोरचं घडतोय असं वाटायला लागते.यातील कथा आणि संवाद हृदयात घर करून जाते.पावलोपावली संघर्ष,शौर्य आणि धैर्याचे दर्शन आपल्याला या कादंबरीतून होतात.करवीर, कोल्हासुर या असुरी वृत्तीच्या आणि स्त्रियांना पायातील वहाण समजणाऱ्या मानसिकतेच्या कानाखाली जोरदार प्रहार ही कादंबरी करते.

लेखकाच्या शब्दांत सांगायचं असल्यास ,या कादंबरीत गोष्ट आहे ,अंबालक्ष्मीच्या खडतर प्रवासाची,बेचिराख आयुष्याला स्वतःतील संपूर्ण ताकदीनिशी पुन्हा साकारण्याची.एकंदरीत ही कथा आहे दोन तेजस्वी बहिणीच्या अलौकिक कर्तृत्वाची आणि त्यागाची.या कथेतून स्त्रीशक्तीचं एक वेगळ रूप अनुभवायला स्त्रीशक्तीचं सामर्थ्य जाणवायला मिळतो.

लेखक म्हणतात :- 

अगदी जन्मापासून स्त्री ची अनेक रूपे आपण पाहतो.आई,बहीण,पत्नी, मैत्रीण,प्रेयसी,मुलगी आणि याहून अनेक रुपात तिला अनुभवतो.कधी तिची माया, वात्सल्य, निरपेक्ष प्रेम,कधी राग,तर कधी त्यांचं सामर्थ्यशाली जगणंही अनुभवण्यास येतं आंबालक्ष्मी प्रतिनिधित्व करते ती या साऱ्याचचं.🖤अगदी नेमकं आणि मोजक्या शब्दांत लेखकांनीच या कादंबरीचं वर्णन केलं आहे.ज्याची प्रचिती आपल्याला ही कादंबरी वाचताना पावलोपावली येत असते.प्रेम,माया, वात्सल्य, राग इत्यादी सर्वकाही या कादंबरीत आपल्याला अनुभवायला मिळतो.जे वाचत असताना आपण पूर्णपणे यामध्ये हरवून जातो.लेखकाच्या अफाट कल्पनाशक्तीचा असंख्य वेळा आपल्याला हेवा वाटून जातो एवढं नक्की.

खरंच अंबालक्ष्मी या दोन व्यक्तिमत्वांमधून आपल्याला बिकट परिस्थितीला सामोरं जाताना,आसुरीवृत्तीचा बिमोड करताना त्यांच्या अंतर्मनातून प्रगट झालेलं त्याचं एक सामर्थ्यशाली रूप अनुभवण्यास मिळेल,जे प्रत्येक स्त्रीमध्ये आणि स्त्री गर्भातून जन्माला आलेल्या प्रत्येकामध्ये अंतर्भूत असतंच, गरज असते त्या सामर्थ्याची जाणीव होण्याची आणि या जाणिवेच्या प्रवासात ही कादंबरी आपल्याला नक्कीच मदत करते.यासोबतच ती मदत करते पौराणिक कथेतील देवांना मानवी रुपात समजून घेण्याची,त्यांना मानवी दृष्टीकोनातून बघून त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची.कारण मानव आदर्श आपल्या सारख्या हाडांमासाच्या मानवाकडूनचं घेईल कोण्या चमत्कार करणाऱ्या देवी/देवताकडून नव्हे.

मला आवडलेले यातील काही विचार :-

★चांगल्या हेतूने केलेल्या कर्मातून कधीही पश्चात्तापाची वेळ येत नाही. स्वार्थी हेतूने केलेले सत्कर्मही दुष्कर्मात मोजले जाते.

★डोळे झाकून पुरुषातील असुरी वृत्ती आणि स्त्रीतलं दैवत्व शोधण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून स्त्री- पुरुषांतला चांगुलपणा शोधायला हवा. 

★आईसोबत खोटं  बोलण्यासारखं मोठं पाप कोणत नाही आणि आईला खरं सांगण्यासारखं पुण्य कोणतही नाही.

नक्की वाचा...♥️

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने