सरोज खान
नृत्यातील जान सरोज खान
नृत्यात ज्यांचा हात पकडणं भल्या भल्यांना आव्हान वाटायचं आणि ज्यांच्या सारखं नृत्य करणं आणि ते शिकवून दाखवणं म्हणजे घाम काढणं असायचं अश्या नृत्यात सुपरस्टार असणाऱ्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान.
सरोज खान यांच्याशी परिचय झाला तेंव्हा एकत्र काम करण्याचे आम्ही ठरवले. वर्षभरा पूर्वी माझ्या मराठी तारका या कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शन करण्यासाठी मी त्यांना विचारले आणि हिंदी प्रमाणे मराठीचे बजेट नसते याची कल्पना दिल्यावर "महेशजी मेरे करीयरकी शुरआत मराठी फिल्मसे हुई थी ” असं सांगून दिग्दर्शक अनंत माने यांच्या एका मराठी चित्रपटासाठी सरोज खान यांनी कोल्हापूर येथे जाऊन नृत्य दिग्दर्शन केले असल्याचे त्यांनी मला सांगितले.
![]() |
saroj-khan |
मुगले आझम चित्रपटात मधुबालाच्या मागे बॅक डान्सर म्हणून नृत्य करणाऱ्या सरोज खान यांनी जिद्द आणि प्रचंड मेहनत घेऊन नृत्य दिग्दर्शक म्हणून स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. वैयक्तिक आयुष्यातही अनेक संकटे येऊन आणि चित्रपटसृष्टीतील राजकारणाला खंबीरपणे तोंड देत सरोज खान वेळोवेळी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
त्याबाबतचे त्यांनी मला सांगितलेले किस्से ऐकुन मला वाटायचं की एखाद्या सिनेमाला शोभेल अशी याची स्टोरी आहे.
माझ्या मराठी तारका कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शन करताना बजेट मध्ये त्यांनी सहकार्य केले आणि अधिकाराने दरडावून सांगितलं”महेशजी आपके साथ काम करते वक्त बजेट की बात लेकर आप बिलकुल टेंशन मत लेना,कुछ काम पैसोके लिये नहीं अपनोके लिये किये जाते हैं जिससे दीलको सुकून मिले".
सरोज खान यांनी मला पूर्ण सहकार्य केलं.माझ्या कार्यक्रमातील काही गाणी त्यांनी हिंदी सिनेमात याआधी नृत्य दिग्दर्शन केलेली होती तरी देखील ती गाणी पुन्हा कार्यक्रमासाठी बसवताना ती आधी तारकांना शिकवण्याआधी त्यांनी मला एकदा बघून घेऊन त्यात काही बदल हवे असतील तर ते सुचवायला सांगितले.त्यांनी असे सांगताच त्यांच्या पुढे मला नतमस्तक व्हावे वाटले.नृत्यात आपल्या कामाने महागुरू असणारी ही बाई कुठेही त्याचा मोठेपणा न दाखवता मला काही सूचना बदल नृत्यात करायचे असतील तर ते सांगायचा अधिकार देते याचं मला अप्रूप वाटले आणि "सरोजजी आप कोरिओग्राफर हो मैं आपको क्या सुझाव दे सकता हू " असे मी सांगताच तुम्ही इतके कार्यक्रम केले आहेत, या शो ची गाणी जी तुम्ही सिलेक्ट केली ती पाहून मला अंदाज आला आहे तुम्हालाही गाणी,नृत्य यातील भरपूर माहिती आहे,लोकांना काय हवं आहे हे तुम्ही जाणता त्यामुळे आपला शो यशस्वी आणि चांगला होण्यासाठी आपल्या दोघांच्या मध्ये चर्चा होऊन काही सूचना असतील तर त्या दिल्या गेल्या पाहिजेत.त्यांचे हे विचार ऐकून का त्या इतक्या मोठ्या आहेत.
त्याची प्रचिती मला त्यांच्याबरोबर काम करत असताना वेळोवेळी आली. तारकांना नृत्य शिकवतानाही अगदी चेहऱ्यावर हावभाव,नजर कशी असावी अश्या अनेक बारीक गोष्टी त्यांनी शिकवल्या.नृत्यासाठी मेहनत घेणाऱ्या, प्रॅक्टिससाठी जास्त वेळ देणाऱ्या अभिनेत्रीचे कौतुक करण्यासाठी रिहल्सल संपली की त्या आठवणीने मला फोन करून नावं सांगायच्या.
मराठी तारका या माझ्या शो च्या निमित्ताने त्यांनी मराठी कार्यक्रमासाठी प्रथमच नृत्य दिग्दर्शन केले आणि आमच्या तारकांना त्यांच्याकडून नृत्य शिकता आले याचा मला अभिमान आहेच आणि सतत जाणीव आहे की खरचं आम्ही सगळे नशीबवान की आम्हाला सरोज खान यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.