दिल चाहता है फिल्म ची आठवण || Dil Chahata Hai || Itsmarathi.com
रविवार दुपारची शांत वेळ, नुकतच जेवण झालेलं असावं आणि tv वर काय लागलाय हे सर्फ करता करता अचानक "दिल चाहता हैं" लागावा, ह्याहून दुसर सुख नाही. काही फिल्म अश्या असतात ज्या आपण ad break मध्ये ही चॅनल चेंज न करता बघतो आणि 'दिल चाहता हैं' त्यातलीच एक फिल्म आहे.
![]() |
dil-chahta-hai |
2001 साली आलेली ही फिल्म त्या काळची कल्ट फिल्म बनली. तसं 2001 साली भारतात बऱ्याच घडामोडी घडल्या, फिल्मइंडस्ट्री साठी तर सुवर्ण काळ होता कारण भारतातून लगान ची ऑस्कर साठी निवड झाली होती. लागन चं कौतुक जगभरातून चालू होतें पण त्याच वेळी दिल चाहता हैं ने फिल्म इंडस्ट्री साठी एक फ्रेश फेज आणली. त्यावेळच्या तरुणाईला आणि अर्बन शहरातलं आयुष्यला ह्या फिल्म ने अगदी करेक्ट ओळखलं होतं. इंडस्ट्री मध्ये अशी चर्चा आहे कि हि फिल्म करायला फरहान ला खूप पापड लाटावे लागले, सैफ अली खान तर फिल्म करणार नव्हता पण आमिर च्या सांगण्यावर त्याने हि फिल्म स्वीकारली आणि अश्या खूप अडचणींचा सामना करता शेवटी हि फिल्म रिलीझ झाली.
फरहान ने त्याच्या डेब्यू फिल्म मध्ये जवळ जवळ सिक्सरचं मारला होता, त्यांनी ह्या फिल्म मध्ये बरेच एक्सपेरीमेंट्स केले फरहान ने मुद्दाम ह्या फिल्म मध्ये कमीत कमी क्लोझप आणि जास्तीत जास्त मिड लॉन्ग किंवा लॉन्ग शॉट ठेवले त्याने त्याच्या बऱ्याच शॉट मध्ये पात्रांना एकत्र एका फ्रेम मध्ये आणलं आणि कॅरेक्टर केमेस्ट्रीची एक वेगळी ट्रीटमेंट दाखवली. एडिट मध्ये सुद्धा त्याने शॉट्स चं duration बऱ्याचदा ८ ते ९ सेकंड ठेवलं जे त्या काळच्या फिल्म ट्रीटमेंटपेक्षा हटके होतं. लिखाणात सुद्धा त्याने प्रत्येक पत्राचा ट्रक अगदी सहजपणे उघडला आणि तेवढ्याच सहजतेने शेवटा कडे नेला. फिल्मच्या आर्ट आणि कॉस्ट्यूम वर सुद्धा फरहान ने अगदी बारकाईने लक्ष दिल होत, मग ते सैफ ची छोटी पण स्वतंत्र रूम असो किंवा अक्षय खन्ना चा दोन मजली बांगला आणि त्यात त्याचा स्टुडिओ ह्या सगळ्यांवर फरहानने खूप बारकाईने काम केलेलं जाणवतं. चित्रपटाचं संगीत सुद्धा शंकर-एहसान-लॉय ह्यांनी अगदी फ्रेश दिलं होत आणि ते त्या वेळच्या तरुणाईने अक्षरशः डोक्यावर घेतलं.
फिल्म काही ठिकाणी कमी सुद्धा पडली मग ते फिल्मच उगाचच वाढलेलं duration असो किंवा शेवटाला फक्त एकाच पात्राच्या (आमिरच्या) ट्रॅक वर केलेलं उगाचच फोकस असो. पण ओव्हरऑल ह्या चित्रपटाने त्या वेळच्या तरुणाईला एक फ्रेश विषय दिला. २००१ साली जी लोकं ११ वर्षांची होते तो आज ३० वर्षांचे झाले असतील पण तरी आजही त्यांच्यासाठी दिल चाहता हैं हा तेवढाच स्पेशल आहे. नाईट आऊट असेल, गोव्याला जायचा प्लॅन असेल, आणि गोव्याला गेल्यावर त्या किल्यावरच्या भिंतीवर बसून काढलेले फोटोज असतील ह्या फिल्मने आपल्याला काही एक्सपीरियन्स दिले जे आजही लोक जगत आहेत.
पण ह्या फिल्म नंतर मात्र जणू काही फरहान हरवला त्याने "लक्ष्य" दिला पण त्या फिल्म ला दिल चाहता हैं ची सर नव्हती, नंतर त्याने डॉन सिरीज केली आणि आता तिसरा डॉन पण तोच डायरेक्ट करतोय असं ऐकलंय पण तरीहि आज मला राहून राहून वाटत कि फरहान कडून अजून एक फिल्म व्हावी जी फक्त फिल्म नसून एक्सपीरियन्स असेल.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.