तनिष्कच्या एका जाहिरातीवरून मागील काही दिवसापासून जो काही आकांडतांडव चाललाय त्याच नेमका कारण कळलं नाही, म्हणजे मलातरी त्यात वावग असा काही नाही वाटलं.
 |
tanishq-ad-controversy image credit-google |
लवजिहाद, हिंदु मुस्लिम यावरून चाललेला वाद पाहिल्यावर लक्षात आला,अरे हिंदू हिंदू म्हणून मिरवणाऱ्यांचा पण लग्न करताना फक्त हिंदू असन हा एकच क्रायटेरिया नसतो, लग्न करताना जात,पोटजात,गोत्र,उच,नीच हे सगळं जुळून आल्यावर बाकी सोपस्कर पार पडतात.निदान विरोध करणारे हिंदू सगळ्या हिंदूंना तरी समानतेची वागणूक देतायत का ?
राहिला प्रश्न जाहिरातदाराने एखादी स्पेसिफिक गोष्ट प्रोमोट करण्याची (मला तरी त्यात चुकीचं काही प्रोमोट केल्याचं खरच वाटत नाही) तर आजपर्यंत असंख्य सुंदर आशा जाहिराती आणि मूव्ही बनले जिथे सामाजिक बांधीलकीचे संदेश दिले गेले पण आपण त्यावरून किती प्रेरणा घेतो ? त्यापैकी आपण किती अमलात आणतो ?
गांधीजींचा मुव्ही किंवा जाहिरात बघून गांधीजी झाल्याचं उदाहरण जगात अजून तरी अस्तित्वात नाही.
मुव्ही बघताना शाहरुख सलमान च्या एन्ट्रीला शिट्ट्या मारणारे आपणच ,गाणे ऐकताना ए आर रेहमान ला तोड नाही म्हणणारे आपणच , प्रयत्नाची पराकाष्ठा करत विरगतीला गेलेला अब्दुल हमीद गोष्ट ऐकताना डोळ्यात पाणी आणणारे आपणच ,क्रिकेटमध्ये आधी अझहर नंतर जहीर ला डोक्यावर घेणारे पण आपणच आणि महान शास्त्रज्ञ एक सच्या देशभक्त म्हटल्यावर ज्यांच्या डोळ्यासमोर डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम येतात ते पण आपणच ना ? मग का आपण एखाद्याकडे बघताना जातीधर्माच्या अदृश्य चष्म्याआडून बघतो आणि लागलीच चिटकवतो त्याला जातिधर्माचा लेबल आणि रंग रूपाचा टॅग.फक्त एक माणूस म्हणून त्याच्याकडे कधी बघणार आहोत आपण ?
एखाद्या राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन समजात द्वेषभावना पसरवायचा जो काही खेळ चाललाय त्याने फक्त दोन गटात तेढ निर्माण होईल आणि देशातील धार्मिक गट ध्रुवीकरणाचे अंतिम टोक गाठतील हे मात्र नक्की.बाकी जाहिरात मागे घ्यायला लावून आपण टाटांना गुडघ्यावर आणला अशा गैरसमजात असलेल्या तथाकथित हिंदूवाद्यांनी देशाच्या प्रगतीत टाटांच असलेला योगदान विसरून त्यांना देशद्रोही घोषित नाही केला म्हणजे मिळवला.
स्वीकृती: ज्ञात तनिष्काच्या जाहिरातीचा संबंध आंतरजातीय विवाहाशी अधिक आहे, परंतु स्त्रियांची ओळख. यात नवीन वधूचे बाळ शॉवरचे वर्णन केले आहे!
लैंगिकता: बोथट पण प्रतिभावान अभिनेत्री कंगना रनौत एक अस्सल प्रश्न उपस्थित करते- वधूच्या गरोदरपणाला तिच्या नवीन कुटुंबात स्वीकारण्याचे प्रतीक मानले पाहिजे का?
गर्भधारणा: बरं, हे बर्याच नववधू, घरगुती निर्माते आणि करिअर करणार्या महिलांना चुकीचा संदेश देते जे गर्भवती होऊ शकत नाहीत किंवा मुलं न घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. वास्तविक समस्यांसह वास्तविक लक्ष्यित प्रेक्षकांसाठी हे तयार केले गेले पाहिजे.
एखाद्या जाती धर्माबद्दल पूर्वाग्रहातून आलेली आकस बाजूला ठेऊन गुन्हेगारी ही एक प्रवृत्ती आहे, ना की एखादी जात किंवा धर्म हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा समाजात होणाऱ्या वाईट गोष्टींकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन कदाचित बदलेल ही आशा.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.