सकाळचा मॉर्निग वॉक | Morning Walk || Itsmarathi.com

 हास्यविनोद चेष्टा मस्करी शिवाय मॉर्निग वॉकला मजा नाही  नाही तर मग ती एक निरस कमिटमेंट होऊन जातेएकट्याने 'वॉक घेण्यातशरीर सदृढ होत असेलही कदाचित,  पण मनाचं काय?


sakal morning result,sakal morning walk,sakal morning video
 सकाळचा_मॉर्निग_वॉक | Morning Walk


आज सकाळी गोल्फवर गेलो तो नेहमीचे "टवाळा आवडे विनोद" वाले स्वच्छ मित्र दिसलेच नाहीत.

हास्यविनोद चेष्टा मस्करी शिवाय मॉर्निग वॉकला मजा नाही  नाही तर मग ती एक निरस कमिटमेंट होऊन जातेएकट्याने 'वॉक घेण्यातशरीर सदृढ होत असेलही कदाचित,  पण मनाचं काय?

दुसऱ्या "राउंड" ला लक्ष गेलं तर मित्र कोपऱ्यात ओटयावर बसलेले.

सगळे गंभीर !!! कुणी नातेवाईक मला "अरे आता तू सत्तरीला आलास" म्हंटलं की मी क्षणभर पोक्तपणाचा,  गंभीरपणाचा अभिनय करतो. पण आज हे सगळेच तरुण असे पोक्त का झालेले?

"मी आलोय !!"

"याबसा "

मला वाटलं होतं बापु म्हणतील "हो का?  अरे व्वा ! आरती ओवाळायला हवी" आणि सगळे खदखदून हसतील. पण बापु जरा जास्तच गंभीर दिसले. 

"रघुकाका,  तुमची ती तरुण तडफदार चवळीची शेंग …. "  मी उगाचच चावटपणा करायचा प्रयत्न केला.

रघुकाका  कसेसेच हसले.

"काय झालंय मित्रांनो? कुणी. कोरोना? "

"छे छे  अभद्र बोलू नका हो. सगळे टक्क आहेत!"

"फिर छाई उदासी क्यूँ यारो? "

(परकी भाषा भावना व्यक्त करायला फार उपयोगी असते)

"काही नाही रे  आज आप्पा आणि बापु जास्त गंभीर आहेत."

"आप्पा?  म्हणजे आपले आप्पा?  म्हणजे हे? आणि बापु?  बापूजी??? हे राम !!! "

 

:

"आप्पा,  काय झालंय?.. बापु??"

"देशपांडे,  तुम्ही नातवाबद्दल नेहमीच पोस्ट टाकता का हो?"

"बऱ्याचदा"

"सरळ विचारतो हं, गैरसमज करून घेऊ नका... का टाकता इतक्या पोस्ट?"

"का म्हणजे? "

"गैरसमज करून घेऊ नका हो  खरंच सरळ विचारतोय !"

"खरं सांगू का? मला खूप आवडतात नातवाबद्दलच्या पोस्ट टाकायला"

"अहो पण का?  असं विचारताहेत ते"

"आज खूपच चेष्टेचा मूड आहे का?"

"तुम्हाला ही सगळी चेष्टा वाटतेय? तुम्ही कधी गंभीर होऊच शकत नाही का हो?

"सॉरी,  आज तुम्ही सगळे जरा सिरीयस आहात हे जाणवलं होतं  पण एक्सेप्ट होतं नव्हतं…….  त्या पोस्ट केवळ माझ्या नातवाच्या नसतात, म्हणजे माझ्या नातवांच्याच असतात पण त्याही पेक्षा त्या आजोबा आणि नातवंड यांच्यातील नाजूक नात्याच्या असतात...  प्रातिनिधिक म्हंटलंत तरी चालेल"

:

"हं.. "

"नातवंड म्हणजे आपला प्राण असतो नाही?"

"हो ना... सगळ्याच आजी आजोबांचा...  ते प्रेम सगळ्यांनाच जाणवत असतं.. मी फक्त शब्दात मांडतो इतकंच. कारण माझं शुद्धलेखन चांगलंह्य ह्य. "

(मी उगाचच फालतु विनोद वगैरे करून वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला)

:

"सॉरी,  खरच सॉरी  "

"नशीबवान आहात..."

"आपण सगळेच म्हातारे.. "

"आमचं नाही हो तसं"

"आप्पा "

".म्हणजे?  नातवंड...?

"आहेत तर...  तीन ! मुलाला मुलगा मुलगी,  मुलीला मुलगा"

"मग? "

"दोघेही परदेशात..  आम्हाला  दीड दोन वर्षानंतरच भेटतात..मोठेच  झालेले असतात दर भेटीत.... लांब आहे ना फिलाडेल्फिया आणि जर्मनी.."

"तुम्ही जाता ना मधून मधून?..."

"जातो हो,  तसे व्हाट्सअप व्हिडीओ कॉल्सही  होतात वरचे वर ....."

"माझेही दोन्ही नातू लांबच असतात.... फक्त महिना पंधरा दिवसातून भेटतात इतकंच !"

"तसं नाही देशपांडे, खरं सांगू का... माझी नातवंड मला शेजारच्या लहान मुलांसारखीच वाटतात..."

"हो...  काही काही लहान मुलं थोडी रिझर्व असतात खरी. आपण त्यांच्याशी खेळायचं.. लहान मुलं होऊन... "

"तशी खेळतात हो...  मजाही करतात माझ्या बरोबर...आम्ही तिकडे गेलो की.. किंवा ते इकडे येतात तेंव्हा .. "

:

"पण.. पण भेटताच "आजोबा" म्हणत धावत येऊन पायाला मिठी मारून बिलगत नाहीत हो... लांबच असतात.."

:

आणि सांगू का देशपांडे,  त्या काऊचिऊच्या आणि वाघ सिंहाच्या टोपीवाल्याच्या गोष्टी इंग्लिशमध्ये सांगताना मजा नाही हो येत...  देअर वॉज लायन  कॅप मर्चंट हे सांगतानाच कससंच वाटतं."

"हो... मी समजू शकतो माधवराव... पण आपल्या पिढीने हे ऍक्सेप्टच करायला हवं.. आणि त्याची सवयही करून घ्यायला हवी. आपल्या आई वडिलांचा काळ नाही राहिला आता... "

"तुमच्या नातवाबद्दलच्या पोस्ट वाचतो ना, तेंव्हा मलाच कुणीतरी काऊचिऊची गोष्ट सांगतय असं वाटतं... "

"बापु………. "

"काय हे बापु.  खूपच सिरीयस होत चाललंय सगळं "

"बापु,  आणि कधीकधी अतिरेकही होतो हं ! मी एकदा नातवाबरोबर  आंघोळ करत होतो. त्याला म्हंटलं "चड्डी काढ" तर तो म्हणाला "तू पन काल"...

"मुलं हो ती.. त्यांना कुठं कळणार दुनियादारी "

"बापु..आज खरंच सिरीयस आहात तुम्ही !! "

:

"खरं सांगू का  आपला आनंद ही प्रातिनिधिक आणि सल ही प्रातिनिधिक.."

:

"लिहीत जा तुम्ही... खरंच लिहीत जा.... "

:

:

"खूप छान वाटतं हो  नातवंड जवळच आहेत असं वाटतं "

:

:

"पण आठवडा,  पंधरवाड्यातून एकदाचहं "

"नाहीतर दुधवाल्यासारखा रोज सक्काळी सक्काळी रतीब सुरु कराल.. पावशेर दुधात शेरभर पाणी टाकून..  "

"खी.. खी.. खी.. खी "

"ख्याख्या. ख्याख्या"

"हीं ह्याही ह्या. ही ह्या "

"हीहीहीहीहीहीहीहीही. "

"ख्यिक..  ख्यिक..  ख्यिक.. "

:

:

"चला...  अजून एक राउंड मारू... "


Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने