या कपलच्या हॉट फोटोशूटनं सोशल मीडियावर तलाव ते जंगल! घातला राडा
![]() |
couple -phtoshoot |
आजकाल लग्नाआधी प्री-वेडिंग (Pre-Wedding) शूट करण्याची क्रेझ आहे. हा नवा ट्रेंड सध्या सुरू झाला आहे. आपलं प्री-वेडिंग शूट भारी करण्यासाठी लोकं वेगवेगळे प्रयोग करत असतात. मात्र केरळमधल्या एक कपलनं एक वेगळाच प्रयोग केला, त्यांनी चक्क जंगलामध्ये फक्त चादर गुंडाळून हॉट कपल फोटोशूट केलं. गेल्या काही दिवसांपासून ऋषी आणि लक्ष्मी यांचे प्री-वेडिंग शूट चर्चेचा विषय झाला आहे.
केरळमधील ऋषी कार्तिकेयन याचा 16 सप्टेंबर रोजी लक्ष्मीशी विवाह झाला. लग्नाआधी या दोघांनी प्री-वेडिंग शूट करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघांनी केरळमधील चहाच्या शेतात हॉट फोटोशूट केले. त्यांनी केवळ पांढऱ्या चादर गुंडाळून फोटो काढले. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
दरम्यान एकीकडे काही लोकांनी या फोटोचं कौतुक केलं आहे. तर, कोहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. युजरनं या अर्धनग्न फोटोवर टीका करत, ही आपली संस्कृती नाही अशा कमेंट केल्या आहेत.
एवढेच नाही तर या दोघांनी तलावाजवळही हॉट फोटोशूट केले. यात दोघांनी एकमेंकाना किस करतानाचा फोटो काढला आहे.
बऱ्याच लोकांनी या जोडप्यावर टीका केली आहे. त्यांचे फोटो अभद्र असल्याचे म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.