चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, एकनाथ खडसे पक्षांतराच्या तयारीत असताना || Itsmarathi.com

कोल्हापूर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा असली तरी भाजप अजूनही आशावादी आहे. 

chnadrakant patil,chandrakant patil photos,eknath khadse,
eknath khadse chandrakant patil

           या सगळ्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आज चंद्रकांत पाटील यांना खडसेंच्या पक्षांतराविषयी विचारले. त्यावर, असं काहीही होणार नसल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

'एकनाथ खडसे यांच्याबाबत पक्षात सकारात्मक चर्चा सुरू आहे. एक दोन आठवड्यात सर्व सुरळीत होणार आहे. मी स्वतः नाथाभाऊंशी बोलतो आहे,' अशी माहिती पाटील यांनी दिली.

'एकनाथ खडसे हे पक्षाला खूप मानतात. तुम्ही मीडियातून बोलू नका अशी विनंती मी त्यांना केली आहे. त्यांनी देखील ते मान्य केलं आहे,' असं पाटील म्हणाले.

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने