वीर सावरकाराप्रमाणे मला सुद्धा तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न- कंगना राणावत

Kangana ranaut
कंगना राणावत

 कंगना रानावतनं स्वत:ची तुलना सावरकरांशी करणं हा काही जणांना सावरकरांचा अपमान वाटला. खरं तर हा कंगनानं स्वत:चा केलेला अपमान आहे.

कितीही मतभेद असो कंगना किमान नडते तरी आणि मागे हटत नाही. आत्मप्रौढीची लागणही कंगनाला झालीये हेही खरं असलं तरी स्वत:च स्वत:ची लाल करत दुसऱ्याच्या नावानं स्वत:चंच आत्मचरित्र लिहून त्याला चरित्र म्हणून खपवण्याइतकी वाईट वेळ कंगनावर आलेली नाही.

 काहीका होईना अभिनेत्री म्हणून तिची स्वत:ची काही मिळकत आहे. कंगनाभक्तांनी नाराज व्हायचं सोडून सावरकरभक्त का नाराज झालेत हे कळायला मार्ग नाही. असो. आपण नीच आहोत याची सरतेशेवटी जाणीव होऊन तुझ्याकडून ही अवाजवी तुलना झालीही असेल.

पण तू आवडत नसूनही एक सांगू इच्छितो की तू इतकीही नीच नाहीस की ही तुलना करावी लागावी. या कसोटीवर सावरकरांचं स्थान अढळ आहे. आणि त्यांची तुलना तुझ्यासारख्या क्षुल्लक आत्ममग्न व्यक्तीशी होणं हा स्वत:च स्वत:ला वीर म्हणण्याइतपतच्या श्रेष्ठ आत्ममग्नतेचा अपमान आहे.


सध्या राजकारणात बिनडोक व्यक्तींचीच चलती आहे. कंगना रानावत ला स्कोप आहे.


#निषेध

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने