मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडंच्या चेहऱ्यावर तणाव, खडसेंच्या प्रवेशाआधी शरद पवारांच्या भेटीला...

कृषीमंत्रीपद किंवा गृहनिर्माण मंत्रिपद खडसेंना देणार अशी चर्चा आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे कृषीमंत्रिपद सोपवले जाणार, असे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, शिवसेना कृषीमंत्रिपद सोडायला तयार नाही, अशी माहिती आता पुढे येत आहेत. तसेच खडसे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी स्वत:चे स्थान सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हेदेखील अनुत्सुक असल्याचे समजते.
jitendra avhad,sharad Pawar,eknath khadse
jitendra avhad

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना कोणती जबाबदारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं असतानाच जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दाखल झाले असल्याची माहिती हाती येत आहे. आव्हाडांकडे गृहनिर्माण खातं आहे. ते आपलं खातं देण्यासाठी तयार नसून यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते शरद पवार यांच्याकडे गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी आव्हाडांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता.
एकनाथ खडसे यांचा थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं की नियोजन मंडळावर त्यांची वर्णी लावायची, याबाबत महाविकास आघाडीत संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, शिवसेना कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडही आपल्याकडील गृहनिर्माण खातं खडसेंना देण्यास तयार नसल्याचं कळतंय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने