शेतकऱ्यांना मदतीसाठी पंतप्रधानांना भेटणार: शरद पवार
उस्मानाबाद, ता. 18: ' अतिवृष्टीमुळे पिकांचेेेे नुकसान झालेल्याया शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल. राज्याची एकट्याची ताकत नाही. याप्रश्नी काही खासदार, मंत्रिमंडळातील काही सदस्य सोबत घेऊन पंतप्रधानांची भेट घेऊन राज्यातील अतिवृष्टी ग्रस्तांना मदत मिळवूून देण्याचा निश्चित प्रयत्न करू,' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचेे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.
![]() |
sharad pawar |
शरद पवार यांनी आज तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, लोहारा तालुक्यातील सास्तूर माकणी, राजेगाव, उमरगा तालुक्यातील कवठा, तर उस्मानाबाद तालुक्यातील करंजखेडा, पाटोदा येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांची संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. राज्यमंत्री संजय बनसोडे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि इतर स्थानिक नेते त्यांच्यासोबत होते.
मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदतीसाठी सकारात्मक आहे. परंतु सध्या राज्याची आर्थिक स्थिती फारशी बरी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्राची मदत लागेलच. राज्यातील खासदार व राज्यातील काही मंत्र्यांसोबत घेऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन नुकसानाची स्थिती त्यांच्या समोर मांडून केंद्र शासनालाही गांभीर्य लक्षात आले असून पंतप्रधानांनी याबाबत निवेदन केल्याचे उल्लेख पवार यांनी केले
टिप्पणी पोस्ट करा
आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.