गृहमंत्री अनिल देशमुख यांची घटनास्थळी भेट दिल्यानंतर घोषणा- पीडित कुटुंबाला घर, आर्थिक मदत देणार


रावेर हत्याकांडातील पिडीत कुटुंबाला शासकीय नियमानुसार जमीन घर आणि आर्थिक मदत देण्याची आणि आरोपींना कठोर व लवकर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. 

गृहमंत्री देशमुख यांनी शनिवारी दुपारी चार वाजता रावेर येथे बोरखेड रस्त्यावरील घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृह थांबलेल्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांची सातंवणा केली. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी पीडित मुलीचे आई वडील व भाऊ यांनी घटनेची माहिती दिली. आपण हे घर व भूमिहीन आहोत चार मुलांची हत्या झाल्याने कुटुंब उघड्यावर आलेला आहे, आम्हाला तातडीने जमीन घर व 25 लाख रुपये द्या, तसेच मुलांना निर्दय पणे मारणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली त्यामुळे तिथेच गृहमंत्र्यांनी घर जमीन व अर्थसहाय्य देणे बाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांना दिले.
Anil deshmukh
रावेर येथे पीडित कुटुंब यांची संवाद साधताना गृहमंत्री अनिल देशमुख सोबत एकनाथ खडसे प्रतिभा शिंदे आणि आमदार शिरीष चौधरी.


अशी मिळेल पीडितांना मदत...

सामाजिक न्याय विभागाच्या सबलीकरण योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला शेतजमीन आवास योजनेअंतर्गत घरकुल व आदिवासी विभागाकडून प्रत्येकी पन्नास हजार असे दोन लाख रुपये मिळणार आहेत. तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबांना तीन लाख रुपये मिळतील, मुख्यमंत्री निधीतून मदतीचे प्रस्ताव पाठवण्यात येईल.

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने